अचानक दारात आले राहुल गांधी, सर्वसामान्य कुटुंब हादरलं, पुढे जे घडलं ते अविश्वसनीय!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय. सर्वच राजकीय पक्षांनी आपले आमदार निवडून देण्यासाठी कंबर कसलीये. तर दुसरीकडे देशभरात दिवाळीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. अवघ्या काही दिवसांवर असलेल्या या सणानिमित्त सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. दिवे, कंदील, फटाक्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. अशात लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका सर्वसामान्य कुटुंबाला अनपेक्षित भेट दिली. (रिया पांडे, प्रतिनिधी / नवी दिल्ली)
advertisement
1/5

25 ऑक्टोबर रोजी (शुक्रवार) राहुल गांधी अचानक पश्चिम दिल्लीतील उत्तम नगरच्या प्रजापती कॉलनीमधील कुंभार मार्केटमध्ये पोहोचले. अत्यंत साध्या पेहरावात त्यांनी तिथल्या कामगारांची भेट घेतली. इतकंच नाही, तर त्यांच्यात बसून त्यांनी मातीची भांडी बनवण्याचं कामही केलं.
advertisement
2/5
राहुल गांधी मार्केटमध्ये येताच लोकांना धक्का बसला. आपण स्वप्न तर पाहत नाही आहोत ना असं त्यांना वाटलं. मात्र राहुल गांधींनी सर्वांशी संवाद साधला आणि त्यांना कम्फर्टेबल केलं.
advertisement
3/5
ज्यांच्या घरी राहुल गांधी गेले होते त्या हरीकिशन यांच्या पत्नी रामवती देवी यांनी सांगितलं, ‘आमच्याकडे अचानक राहुल गांधी आले. कुणाच्या काही ध्यानीमनी नसताना त्यांना समोर पाहून सर्वांना धक्का बसला. ते आमच्याकडून मातीचे दिवे बनवायला शिकले. अगदी पारंपरिक पद्धतीनं माती तयार करण्यापासून, ती चाळण्यापासून, त्यात पाणी मिसळण्यापासून चाकावर दिवे बनवण्यापर्यंत सर्वकाही त्यांनी केलं.’ त्या पुढे म्हणाल्या, ‘राहुल गांधींनी एकूण 3 दिवे बनवले, 1 आईसाठी, 1 बहिणीसाठी आणि 1 स्वतःसाठी. तसंच त्यांनी मातीचं मडकंही तयार केलं. हे क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय ठरले.’
advertisement
4/5
हरीकिशन यांची मुलगी सीमा हिनं सांगितलं, ‘राहुल गांधी यांनी सर्वांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संवाद साधला. ते आमच्यातलेच एक वाटत होते. एवढ्या मोठ्या नेत्याचं साधं व्यक्तिमत्त्व पाहायला मिळालं. आमच्या मनावर थोडं ओझं होतं, मात्र गप्पांमधून राहुल गांधींनी ते उतरवलं, अगदी हलकंफुलकं असं वातावरण तयार झालं होतं.’
advertisement
5/5
दरम्यान, ज्यांच्या घरी राहुल गांधी गेले होते त्या सर्वसामान्य कुटुंबाला साक्षात शिल्पगुरू मानलं जातं. इथल्या प्रत्येक सदस्याच्या हातात जणू जादू आहे. त्यांना शिल्पकलेतील अनेक मोठमोठे पुरस्कार मिळाले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी या सर्वसामान्य कुटुंबाला दिलेली ही गोड भेट होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Politics/
अचानक दारात आले राहुल गांधी, सर्वसामान्य कुटुंब हादरलं, पुढे जे घडलं ते अविश्वसनीय!