TRENDING:

दिवाळीसाठी 40 रुपयांत खरेदी करा आकर्षक लाईट्स, पुण्यात इथं आहे होलसेल मार्केट

Last Updated:
यंदा दिवाळीला चायनिज लायटिंगसोबतच भारतीय बनावटीच्या विद्युत रोषणाईच्या साधनांना मोठी मागणी आहे. पुण्यात इथं होलसेल मार्केट आहे.
advertisement
1/9
दिवाळीसाठी 40 रुपयांत खरेदी करा आकर्षक लाईट्स, पुण्यात इथं आहे होलसेल मार्केट
दिवाळी हा सण आता काहीच दिवसांवर आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी सगळीकडे लोकांची लगबग पाहायला मिळतेय.
advertisement
2/9
दिवाळी म्हंटल की घर सजावट आली. यासाठी पणत्या, विविध प्रकारचे साहित्याने बाजार सजलेले असतात. आपलं घर सजवण्यासाठी आवर्जून आकर्षक विद्युत रोषणाईची खरेदी केली जाते.
advertisement
3/9
पुण्यातील रविवार पेठेतील मार्केट मध्ये या लाईट्स खरेदी करू शकता. या वर्षी चायना लाईट सोबतच भारतीय लाईट देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अगदी 40 रुपये पासून या ठिकाणी लाईट्स मिळतात.
advertisement
4/9
सजावटीसाठी विद्युत माळांसोबतच 8 mm मध्ये मोठे बल्ब सुद्धा उपलब्ध आहेत. ऑप्टिकल फायबर मध्येही अनेक पर्याय आहेत. तर चायनीज आणि भारतीय बनावटीची विद्युत रोषणाईची उपकरणे या ठिकाणी मिळतात.
advertisement
5/9
स्टार लाईट, पणती, सिलेंडर, शुगरकॅन, डायमंड, क्रिस्टल जेल गोटी, वॉटरप्रूफ एलीडी, ऑप्टिकल फायबर, लीप तोरण या सारखे अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात.
advertisement
6/9
यंदा मार्केटमध्ये चायना ऐवजी इंडीयन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची रेलचेल दिसून येत आहे. समयी, इलेक्ट्रॉनिक्सचे दिवे, पाण्यावर चालणारे दिवे, तोरण, लाईट इत्यादी घर सजावटीच्या वस्तू मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
7/9
मार्केटमध्ये 40 रुपयांपासून 850 रुपयांपर्यंत लाईट्स विक्रीस उपलब्ध आहेत. दिवाळीच्या या सिझन मध्ये या वस्तूसाठी मोठी मागणी असते, अशी माहिती मेमसाब बॅग्स दुकानाचे मालक नेमचंद गाडा यांनी सांगितले.
advertisement
8/9
कमी किमती मध्ये होलसेल दरात या ठिकाणी विविध प्रकारचे रोषणाईचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये लोकांची मोठी गर्दी आहे.
advertisement
9/9
तुम्हालाही तुमची दिवाळी प्रकाशमय करायची असेल तर रविवार पेठेतील मार्केट मधून विविध वस्तू व लाईट खरेदी करू शकता. भोरी आळी रविवार पेठ इथे हे मार्केट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
दिवाळीसाठी 40 रुपयांत खरेदी करा आकर्षक लाईट्स, पुण्यात इथं आहे होलसेल मार्केट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल