पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताय, सिंहगड आहे बेस्ट लोकेशन, नयनरम्य दृश्य पाहून व्हाल मोहित, photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. मात्र, यासोबतच पावसाळ्यात पर्यटनासाठीही पर्यटकांची मोठी पसंती येथील पर्यटन स्थळांना मिळते. पावसाळा सुरू झाल्यावर पर्यटकांची पावलं ही निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिहंगडाकडे आपोआप वळतात. (प्राची केदारी/पुणे, प्रतिनिधी)
advertisement
1/6

चोहीकडे असणारी झाडे, हिरवगार डोंगर, हा सर्व नयनरम्य असा परिसर पाहण्यासाठी पर्यटक व ट्रेकर हे मोठ्या प्रमाणात याठिकाणी येतात.
advertisement
2/6
डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो. हा किल्ला तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.
advertisement
3/6
गडावर भगवान शंकराचे मंदिर आहे. ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंड आणि सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे. कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की, डावीकडे हे अमृतश्वराचे प्राचीन मंदिर लागते.
advertisement
4/6
भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव आणि भैरवी अशा दोन मुर्ती दिसतात. गडावर येणारे पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठीही येतात.
advertisement
5/6
आता सर्वत्र पाऊस झाल्यामुळे वातावरणात बदल झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा वातावरणात पर्यटक बाहेर पडतात. पुण्यापासून अगदी जवळच हा किल्ला आहे ट्रेकिंगसाठीही सोपा मानला जातो. त्यामुळे भरपूर पर्यटक या सिहंगडाकडे जातात.
advertisement
6/6
खळखळ वाहणारे धबधबे आणि चारही बाजूने खुललेलं निसर्ग सौंदर्य तसेच किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक याठिकाणी येतात. तुम्हालाही हे निसर्गसौंदर्य अनुभवायचं असेल तर तुम्हीही याठिकाणी नक्की जाऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताय, सिंहगड आहे बेस्ट लोकेशन, नयनरम्य दृश्य पाहून व्हाल मोहित, photos