Weather Alert: धुक्याची चादर अन् थंडीचा कडाका, पश्चिम महाराष्ट्रात गारठा वाढला, आजचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पावसानं ब्रेक घेतल्यानंतर राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पारा घसरला आहे.
advertisement
1/7

उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्रात येवू लागल्याने गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट टिकून असल्याने हुडहुडी कायम आहे. आज 14 नोव्हेंबर रोजी राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात गुरुवारी 30.2 कमाल आणि 13.7 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. आज पुणे जिल्ह्यातील कमाल तापमान 30 अंशावर राहील. तसेच किमान तापमान पारा 14 अंशांवर राहणार असल्याने पुण्यात थंडीचा जोर कायम राहणार आहे.
advertisement
3/7
साताऱ्यात गारठा वाढत असून धुक्यासह दव पडत आहे. गुरुवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 31.1 अंशावर राहिला. तर 15 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात अंशत वाढ होऊन 15 आणि 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल.
advertisement
4/7
कोल्हापूरमध्ये दिवसाची सुरुवात साधारण 20 अंश सेल्सिअसच्या किमान तापमानाने होईल. दिवस पुढे जाईल तसे तापमान वाढणार असून पारा 31 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात तापमानात अंशत चढ-उतार होत आहेत. गुरुवारी 32.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज कमाल तापमानात अंशत वाढ होऊन पारा 33 अंशावर राहील. मात्र किमान तापमानाचा पारा 16 अंशापर्यंत खाली येईल. सोलापूरमध्ये दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 31.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात दिवसभर निरभ्र आकाशासह कमाल तापमान 30 अंशावर राहील. तसेच किमान तापमान 18 अंशावर राहील. सांगलीत पहाटे थंडीचा कडाका आणि दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती आहे.
advertisement
7/7
राज्यात गारठा वाढत असून, पहाटे धुक्यासह दव पडल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. मात्र थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पहाटे थंडी, दुपारी कडक ऊन आणि रात्री परत गारठा जाणवत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: धुक्याची चादर अन् थंडीचा कडाका, पश्चिम महाराष्ट्रात गारठा वाढला, आजचं अपडेट