Weather Alert: तुफान इज बॅक! मंगळवारी राज्यात मुसळधार कोसळणार, 17 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मंगळवारी राज्यातील तब्बल 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात 26 ऑगस्ट रोजी राज्यात पावसाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7

गणरायाच्या आगमनापूर्वीच राज्यात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यात कोकणात मुसळधार, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/7
मंगळवारी राज्यातील तब्बल 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात 26 ऑगस्ट रोजी राज्यात पावसाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सातही जिल्ह्यांना 26 ऑगस्टसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं पुनरागमन होणार आहे. पुण्याच्या घाट परिसराला मुसळधार तर पुणे शहरांमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. तर उर्वरित छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: तुफान इज बॅक! मंगळवारी राज्यात मुसळधार कोसळणार, 17 जिल्ह्यांना अलर्ट