Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, हवामानात मोठे बदल, 24 तासांसाठी अलर्ट
- Reported by:
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कल्याण-डोंबिवलीसह ठाणे परिसरातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यात थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. डिसेंबर अखेर थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह कोकणात देखील पारा घसरला आहे. ठाण्यासह कल्याण डोंबिवली, बदलापूर, शहापूर आणि मुरबाड परिसरात शनिवारी हवामान कसं असेल? जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याणमध्ये 27 डिसेंबर दिवसभर हवामान स्वच्छ, कोरडे आणि आल्हाददायक राहील. किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील. शुक्रवार पेक्षा आज थंडीचा कडाका जास्त जाणवेल.
advertisement
3/5
डोंबिवली शहरातील हवामान उबदार आणि थोडी थंडी जाणवणारे असेल. कमाल तापमान 33 अंश ते 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. आज दिवसा हवामान उबदार राहून संध्याकाळनंतर थंडावा जाणवेल
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात शुक्रवारपेक्षा आज गारठा अधिक जाणवणार असून सकाळी दाट धुके राहील. कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंशांच्या आसपास असेल. त्यामुळे आजचे एकूण हवामान कोरडे आणि आल्हाददायक राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये शुक्रवारपेक्षा आज तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमान 9 अंश सेल्सिअस तर कमाल 22 अंश सेल्सिअस असेल. हवामान आल्हाददायक, थंड आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर मुरबाड, शहापूर तालुक्यातील कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, हवामानात मोठे बदल, 24 तासांसाठी अलर्ट