TRENDING:

कबुतराला खायला द्याल तर थेट 5000 दंड, काय आहे नियम अन् कुठे लागू होणार?

Last Updated:
मुंबई उच्च न्यायालयाने नितीन सेठ यांना कबुतरांना दाणे टाकल्याबद्दल ५,००० रुपयांचा दंड ठोठावला. सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा.
advertisement
1/6
कबुतराला खायला द्याल तर थेट 5000 दंड, काय आहे नियम अन् कुठे लागू होणार?
सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकणे एका मुंबईकर व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. कबुतरांमुळे जीवघेणे आजार पसरण्याचा धोका असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने या व्यावसायिकाला ५,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कडक कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
2/6
दादर येथील ५२ वर्षीय व्यावसायिक नितीन सेठ हे १ ऑगस्ट रोजी माहीम परिसरातील एका बंद असलेल्या कबुतरखान्याबाहेर कबुतरांना दाणे टाकत होते. याच वेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव शहराच्या बहुतांश भागात कबुतरांना खाऊ घालण्यावर आधीच बंदी घातली आहे.
advertisement
3/6
या बंदीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. नितीन सेठ यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता. कलम २२३ (ब)सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे. सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेला बाधा निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
advertisement
4/6
या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांमुळे पसरणाऱ्या आजारांबाबत चिंता व्यक्त केली. कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि त्यांच्या संपर्कामुळे मानवी आरोग्याला, विशेषतः श्वसनाच्या जीवघेण्या आजारांचा धोका संभवतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
advertisement
5/6
केवळ धार्मिक किंवा भूतदयेच्या नावाखाली सार्वजनिक आरोग्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही, हा संदेश या निर्णयाद्वारे देण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने आधीच स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाऊ घालणे हे केवळ उपद्रव नसून तो एक कायदेशीर गुन्हा आहे.
advertisement
6/6
या कारवाईमुळे आता सार्वजनिक ठिकाणी दाणे टाकणाऱ्यांवर पालिका आणि पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शिस्त पाळून सार्वजनिक आरोग्य जपण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
कबुतराला खायला द्याल तर थेट 5000 दंड, काय आहे नियम अन् कुठे लागू होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल