TRENDING:

Mumbai-Pune Expressway : फिरायला जात असाल तर जरा थांबा! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड गर्दी; बोरघाटात 4 KM पर्यंत वाहनांच्या रांगा

Last Updated:
बोरघाटात 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले आहेत
advertisement
1/7
फिरायला जाताय? मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गर्दी; बोरघाटात 4 KM पर्यंत रांगा
नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले आहेत. पुणे मुंबईतील अनेकांनी लोणावळ्याची वाट धरली आहे. परिणामी नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
advertisement
2/7
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आज सकाळपासूनच पुणे लेनवर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.
advertisement
3/7
नवीन वर्ष साजरं करण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडल्याने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महामार्ग पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक्सप्रेस वेवर दाखल झाले आहेत
advertisement
4/7
बोरघाटात 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे तुम्हीही या मार्गावरून प्रवासासाठी निघणार असाल, तर थोडा विचार करूनच प्रवासाला सुरुवात करा
advertisement
5/7
मागील तीन चार दिवसांपासून हेच चित्र या महामार्गावर दिसत आहे. पर्यटक नवीन वर्षाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
advertisement
6/7
लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वरमध्ये जाण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडत आहेत. महामार्ग पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
advertisement
7/7
लोणावळ्यातील हॉटेल्समध्येही पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग केलं आहे. 70 टक्के हॉटेल्स ऑनलाईन बुक झाले आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Mumbai-Pune Expressway : फिरायला जात असाल तर जरा थांबा! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड गर्दी; बोरघाटात 4 KM पर्यंत वाहनांच्या रांगा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल