पुष्कर जोगनंतर प्रसिद्ध डायरेक्टरच्या इमारतीला आग, 23 व्या मजल्यावर धुराचे लोट; अंकिता लोखंडे धावली मदतीला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता पुष्कर जोगनंतर प्रसिद्ध डायरेक्टरच्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. इमारतीच्या 23 व्या मजल्यावर धुराचे लोट पसरले होते. आगीत अडकलेल्या डायरेक्टरच्या मदतीला अभिनेत्री अंकिता लोखंडे धावून आलेत.
advertisement
1/8

मराठी अभिनेता पुष्कर जोगच्या मुंबईतील घराला नुकतीच आग लागली. पुष्करनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. पुष्कर जोगच्या घराला आग लागली तेव्हा त्याची मुलगी त्याच्याबरोबर होती. घराला लागलेली आग इतकी भीषण होती की पुष्करला घरातून बाहेर पडला आलं नाही.
advertisement
2/8
पुष्करने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मदतीची मागणी केली होती. अग्नीशमनदलाचे जवान वेळेत तिथे पोहोचल्यानं आग आटोक्यात आली आणि पुष्कर आणि त्याच्या मुलीचा जीव वाचला.
advertisement
3/8
पुष्कर जोगच्या घराला लागलेल्या आगीची माहिती ताजी असताना एका प्रसिद्ध डायरेक्टरच्या घरालाही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी वेस्ट परिसरात गुरुवारी 25 डिसेंबर रोजी सोरेंटो अपार्टमेंटमध्ये आग लागली. 23 मजल्यांची ही इमारत असून इमारतीच्या 12, 13 आणि 14व्या मजल्यापर्यंत आग पसरली होती.
advertisement
4/8
याच इमारतीच्या 14व्या मजल्यावर प्रसिद्ध फिल्ममेकर संदीप सिंह यांचं घर आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. बाब म्हणजे संदीप सिंह या दुर्घटनेत सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
5/8
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी अंधेरी वेस्टमधील या निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावर अचानक आग लागली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला आणि तो वरच्या मजल्यांपर्यंत पसरला. त्यामुळे अनेक रहिवासी इमारतीत अडकले होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत मुंबई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिड्या आणि विशेष उपकरणांच्या मदतीने तब्बल 40 रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
advertisement
6/8
या अपार्टमेंटमध्ये राहणारे दिग्दर्शक-निर्माते संदीप सिंह नुकतेच हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर कोकिलाबेन रुग्णालयातून घरी परतले होते. घरी परतल्यानंतर लगेचच ही आग लागल्यामुळे त्याचे कुटुंबीय घाबरले.
advertisement
7/8
संदीप सिंह यांच्या मदतीसाठी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विक्की जैन धावले आहेत. दोघांनी संदीप यांना त्यांच्या घरी नेलं आहे. तिथे त्यांना आराम करण्यासाठी खास व्यवस्था केली आहे.
advertisement
8/8
संदीप सिंह यांनी 'मैरी कॉम', 'सरबजीत', 'अलीगढ़', 'झुंड', 'स्वतंत्र्यवीर सावरकर', 'सफेद' आणि छत्रपती शिवाजी महाराज' यांसारख्या अनेक प्रसिद्ध सिनेमाची निर्मिती व दिग्दर्शन केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पुष्कर जोगनंतर प्रसिद्ध डायरेक्टरच्या इमारतीला आग, 23 व्या मजल्यावर धुराचे लोट; अंकिता लोखंडे धावली मदतीला