TRENDING:

2 महिन्यापूर्वी लग्न, श्रीलंकेत हनीमूनमध्ये वाद, 40 लाखांसाठी अमानुष छळ, बंगळुरूमध्ये पत्नी नागपुरात पतीचा शेवट

Last Updated:
नागपूर येथील वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये आईसह आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेत मुलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर आहे.
advertisement
1/7
2 महिन्यापूर्वी लग्न, श्रीलंकेत हनीमून, बंगळुरूमध्ये पत्नी नागपुरात पतीचा शेवट
नागपूर येथील वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये आईसह आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेत मुलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर आहे. आईचे नाव जयंती तर मुलाचे नाव सुरज आहे. दोघेही मूळचे बेंगळुरू येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
2/7
सुरजचे २६ वर्षीय गानवी उर्फ राशीसोबत २९ ऑक्टोबर, २०२५ रोजी लग्न झालं होतं. लग्नानंतर हे कपल हनीमूनसाठी श्रीलंकेला गेलं होतं. पण हनीमूनदरम्यान झालेल्या वादामुळे नवरी मधूनच घरी परतली. तिचा हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याचा आरोप तिने पतीवर केला होता.
advertisement
3/7
सुरजची पत्नी गानवी हीने बंगळुरूमध्ये बुधवार २४ च्या रात्री तिच्या आई वडीलांच्या घरी गळफास घेतला. या घटनेनंतर गानवीच्या कुटुंबीयांनी सूरजसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
advertisement
4/7
रिसेप्शनसाठी सूरजच्या घरचे ४० लाख रुपये मागत होते. याच तणावातून गानवीनं आत्महत्या केली, असा दावा कुटुंबीयांनी केला. तसेच त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं. सासरच्यांना अटक करण्याची मागणी केली.
advertisement
5/7
दरम्यान, बेंगळुरूमध्ये आंदोलन सुरू असतानाच सुरज आणि त्याची आई जयंती नागपूरला दाखल झाले. त्यांनी शहरातील सोनेगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. इथंच हॉटेलच्या खोलीत दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
6/7
यात सूरजचा मृत्यू झाला. तर आई जयंती यांची परिस्थिती चिंताजनक आहे.
advertisement
7/7
दोन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या जोडप्याचा अशाप्रकारे भयंकर शेवट झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नागपूरच्या सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
2 महिन्यापूर्वी लग्न, श्रीलंकेत हनीमूनमध्ये वाद, 40 लाखांसाठी अमानुष छळ, बंगळुरूमध्ये पत्नी नागपुरात पतीचा शेवट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल