TRENDING:

Korean Love Game : काय आहे तो कोरियन लव्ह गेम; ज्याच्यामुळे गेला 3 सख्ख्या बहिणींचा बळी

Last Updated:
What Is Korean Love Game : कोरियन लव्ह गेममुळे 3 सख्ख्या बहिणींचा मृत्यू, उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना. कोरिय लव्ह गेमच्या आहारी गेलेल्या या तिघींनी मृत्यूला कवटाळलं. त्यामुळे हा गेम आता चर्चेत आला आहे.
advertisement
1/5
काय आहे तो कोरियन लव्ह गेम; ज्याच्यामुळे गेला 3 सख्ख्या बहिणींचा बळी
हा फक्त टाईमपाससाठी खेळला जातो तसा सामान्य गेम नाही, तर तो कोरियापासून प्रेरित आहेत. जिथं के-ड्रामा आणि के-पॉपची प्रचंड क्रेझ आहे.  कोरियन स्टाईल ऑनलाइन प्रेम किंवा रोमँटिक टास्कवर आधारित गेम आहे.
advertisement
2/5
इथं युझर्स कोरियन संस्कृती, के-पॉप आणि के-ड्रामामध्ये बुडलेले असतात. युझर्स स्वतःला कोरियन समजू लागतात. स्वतःला राजकुमारी किंवा कोरियन प्रेमी समजतात. खेळाडू एक व्हर्च्युअल प्रेमी किंवा जोडीदार निवडतात जो कोरियन शैलीत बोलतो, रोमँटिक मेसेज पाठवतो आणि डेली टास्क देतो. गेममध्ये अज्ञात लोक किंवा चॅटबॉट्स बोलतात.
advertisement
3/5
सुरुवातीला यात दिवसभर फोटो पाठवणं, लिहिणं किंवा गप्पा मारणं यासारखे छोटे-छोटे टास्क असतात. नंतर टास्क अधिक खासगी आणि डेंजर बनवू शकतात. गेम जसजसा पुढे जातो तसतसे टास्क अधिक कठीण होतात. शेवटच्या टास्कमध्ये स्वतःला नुकसान पोहोचवणं आहे. ज्यात मृत्यूचाही समावेश आहे.
advertisement
4/5
हा गेम ऑनलाइन खेळता येतो. या गेमसाठी कोणतंही विशिष्ट अॅपचं नाव नाही पण तो इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. मुलं घरी बसून तो डाउनलोड करतात.
advertisement
5/5
या गेमचे बहुतेक युझर्स असे आहेत जे सहजपणे यात अडकतात कारण हा गेम रोमँटिक वाटतो, भावनांना स्पर्श करतो. त्यामुळे त्यात जे होतं ते खरं प्रेम वाटतं आणि गेमचे टास्क पूर्ण करायला प्रवृत्त करतं. पण प्रत्यक्षात ते एक व्यसन बनतं, मनावरील नियंत्रण सुटतं. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Korean Love Game : काय आहे तो कोरियन लव्ह गेम; ज्याच्यामुळे गेला 3 सख्ख्या बहिणींचा बळी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल