मिल कॉर्नर परिसरातील इमारतीच्या मालक शकुंतला बापूराव बोरसे यांनी आपला गाळा मेडिकल चालवण्यासाठी भाड्याने दिला होता. मात्र, गाळा सोडण्यास सांगूनही भाडेकरू ऐकत नसल्याने दीर्घकाळ वाद सुरू होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, याच मानसिक तणावामुळे शकुंतला यांचे 24 डिसेंबर रोजी निधन झाले. निधनानंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह भारत मेडिकलसमोर आणून आपला आक्रोश मांडला. काही राजकीय पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस अंमलदार देवीदास वाडेकर यांनी धाव घेतली. मात्र, कुटुंबीयांनी जवळपास तासभर मृतदेह हलवला नाही.
advertisement
घरातून निघाले अन् भयंकर घडलं, 27 दिवस कुटुंबानं शोधलं, पण तोवर सगळं संपलं, छ. संभाजीनगर हळहळलं
अखेर सिटी चौक पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवणे तसेच मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपाखाली कुटुंबातील दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. किरण राजू बोरसे, कपिल राजू बोरसे, श्याम राज बोरसे, कृष्णा राजू बोरसे, स्वप्नील दीपक बोरसे, करण अरुण बोरसे, नितीन गुलाब लिंगायत, लखन वसंत लिंगायत, लखन अरुण बोरसे व सनी गणेश दळवी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार सुधाकर मिसाळ करीत आहेत.






