6 दिवस दारु प्यायले पण दीड दिवसात मॅच संपवली, अखेरच्या 4 तासात इंग्लंडने कशी मारली बाजी? पाहा मॅचचे Highlight Photos
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Aus vs Eng 4th Test : मेलबर्नमध्ये सध्या सुरू असलेल्या क्रिकेटच्या रणसंग्रामात खेळाडूंना बॅटिंग करताना कठीण आव्हानाचा सामना करावा लागला. या ऐतिहासिक मैदानावर बॉलर्सनी वर्चस्व गाजवलं असून मॅचच्या केवळ दीड दिवसात दोन्ही टीम्सच्या 30 विकेट्स पडल्या होत्या.
advertisement
1/6

बॉक्सिंग डे मॅचच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव पूर्ण केला. इंग्लंडने कांगारूंना लोळवलं. टीमसाठी ट्रेव्हिस हेड याने 67 बॉल्समध्ये सर्वाधिक 46 रनची खेळी केली. कॅप्टन स्टीव्ह स्मिथ याने 39 बॉल्स खेळून 24 रन केले आणि तो नाबाद राहिला. पण इंग्लंडने अखेर बाजी मारली.
advertisement
2/6
याशिवाय आयपीएल ऑक्शनमध्ये चर्चेत असलेल्या कॅमेरून ग्रीन याने 19 रनचे योगदान दिले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 152 तर इंग्लंडने 110 रन केले होते. त्यानंतर इंग्लंडने कमबॅक केलं अन् दुसऱ्या डावात 175 धावा पूर्ण केल्या.
advertisement
3/6
इंग्लंडच्या बॉलर्सनी दुसऱ्या डावात कमाल कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या बॅटर्सना स्वस्तात माघारी धाडले. ब्रायडन कार्स याने 11 ओव्हरमध्ये 34 रन देऊन 4 गडी बाद केले. कॅप्टन बेन स्टोक्सने 3 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाची कंबर तोडली.
advertisement
4/6
तर जोश टंगने 2 आणि गस ॲटकिन्सनने 1 विकेट घेतली. आता इंग्लंडला ही चौथी मॅच जिंकण्यासाठी 175 रनचे टार्गेट मिळाले होते, त्यांना आपली प्रतिष्ठा वाचवण्याची संधी होती अन् इंग्लंडने या संधीचं सोनं केलं.
advertisement
5/6
इंग्लंडकडून दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरूवात करून दिली. बेन डकेट याने 34 धावांची आक्रमक खेळी केली. तर झॅक क्रॉली याने 37 धावा करत इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं. त्यानंतर जेकब बेथेल याने इंग्लंडला सांभाळलं.
advertisement
6/6
दरम्यान, जेकब बेथेल याने 40 धावांची खेळी केली. तर जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी विजय खेचून आणला अन् इंग्लंडने चौथी टेस्ट जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केलंय. अखेरच्या 10 धावा बाकी असताना सामना अधिक रोमांचक झाला होता. बेन स्टोक्स आऊट झाल्याने सर्वांची धडधड वाढली होती. पण अखेर इंग्लंडने बाजी मारली अन् सामना जिंकला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
6 दिवस दारु प्यायले पण दीड दिवसात मॅच संपवली, अखेरच्या 4 तासात इंग्लंडने कशी मारली बाजी? पाहा मॅचचे Highlight Photos