Free Alcohol : इथं दररोज फ्री मिळते दारू, तळीरामांसाठी बेस्ट ठिकाण! आहे कुठे?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Free Liquor : थर्टी फर्स्ट म्हणजे दारू पार्टी असं समीकरण अनेकांसाठी आहे. आता दारू म्हणजे पैसे मोजावे लागतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल असं ठिकाण आहे जिथं दररोज फ्री बिअर मिळते.
advertisement
1/7

थर्टी फर्स्ट जवळ आला आहे. त्यामुळे काही जण घरात, काही जण हॉटेल, काही जण रिसॉर्ट, काही जण फार्म हाऊसवर थर्टी फर्स्ट पार्टी करण्याच्या विचारात किंवा तयारीत आहे. थर्टी फर्स्ट म्हणजे दारू पार्टी असं समीकरण अनेकांसाठी आहे. आता दारू म्हणजे पैसे मोजावे लागतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल असं ठिकाण जिथं दररोज फ्री बिअर मिळते.
advertisement
2/7
असे हॉटेल, रेस्टॉरंट्स जिथं बुकिंगच्या किमतीत सर्वकाही समाविष्ट आहे. एकदा तुम्ही पैसे दिले की तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त गोष्टीसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. यात जेवण, मनोरंजन आणि दारूचाही समावेश आहे.
advertisement
3/7
मेक्सिको, जमैका आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील काही रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स त्यांच्या खोल्यांमध्ये मिनीबार देतात. मेक्सिको आणि कॅरिबियनच्या काही भागात बाहेर जाण्यापेक्षा रिसॉर्टमध्ये सर्वकाही असणं अधिक सुरक्षित आणि अधिक आरामदायक मानलं जातं. ते पाणी, सोडा, लोकल बिअर आणि कधीकधी लोकल चवीचं वाइन मोफत देतात. ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दररोज पुन्हा भरले जातात. जर तुम्ही रेफ्रिजरेटर रिकामा केला तर हाऊसकीपिंग दुसऱ्या दिवशी ते मोफत भरेल. काही हॉटेल्समध्ये मोफत व्हिस्की, वोडका आणि रम देखील दिलं जातात.
advertisement
4/7
जर्मनी आणि चेक रिपब्लिकमध्ये बिअर संस्कृती खोलवर आणि जुनी आहे. जर्मनी आणि चेक रिपब्लिकमधील अनेक बुटीक हॉटेल्स आणि स्थानिक हॉटेल्स वेलकम ड्रिंक म्हणून बिअर देऊन पाहुण्यांचं स्वागत करतात. काही लक्झरी हॉटेल्समध्ये मिनी-बारमध्ये पाण्यासोबत स्थानिक बिअरच्या एक किंवा दोन बाटल्या मोफत मिळू शकतात.
advertisement
5/7
द लिव्हली टोकियो, ओसाका इत्यादी लोकप्रिय जपानी हॉटेल चेन असलेल्या लिव्हली हॉटेल्सची फ्री बियर टाइम नावाची संकल्पना आहे. इथं संध्याकाळी 5.30 ते 6.30 पर्यंत सर्व पाहुण्यांना अनलिमिटेड फ्री बियर दिली जाते.
advertisement
6/7
व्हिएतनाम हा बिअरसाठी जगातील सर्वात स्वस्त देशांपैकी एक आहे, ज्याला बिया होई म्हणून ओळखलं जातं. तिथले काही बजेट हॉस्टेल आणि हॉटेल्स त्यांच्या पाहुण्यांना सोशल अवर्स किंवा हॅपी अवर्समध्ये मोफत बिअर देतात. व्हिएतनामी हॉटेल्समधील पाहुण्यांना त्यांच्या खोल्यांमध्ये असलेल्या मिनी-रेफ्रिजरेटर्समध्ये पाणी सोबत मोफत बिअर मिळते. हे अनेक हॉटेल्समध्ये उपलब्ध आहे आणि सर्व पंचतारांकित हॉटेल्स ही सुविधा देतात.
advertisement
7/7
सूचना : हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. दारू पिण्यास प्रोत्साहन देणं हा न्यूज18मराठीचा उद्देश नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Free Alcohol : इथं दररोज फ्री मिळते दारू, तळीरामांसाठी बेस्ट ठिकाण! आहे कुठे?