Weather Alert: 16 फेब्रुवारीला वारं फिरलं! कोकणात यलो अलर्ट, कल्याण-डोंबिवलीत कसं असेल हवामान?
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत असून ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात पारा चढला आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ. " width="1500" height="1000" /> महाराष्ट्रात होळी आधीच उन्हाचा तडाखा वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात हवामानातील विचित्र बदलांमुळे यलो अलर्ट जारी करण्यता आला आहे. सोमवारी, 16 फेब्रुवारी रोजी उष्ण, कोरडे आणि दमट हवामानाचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. विशेषतः मुंबईत पुढील काही दिवस पारा सामान्यपेक्षा वर जाण्याची शक्यता असून हवामान उबदार राहील. ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली मधील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यात हवामान मुख्यत्वे स्वच्छ आणि उष्ण राहील. किमान तापमान 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान वाढ होऊन 38 अंश सेल्सिअस राहील. दुपारी कडक ऊन असल्याने नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी. विशेषत: 10 ते 4 या वेळेत थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे. संध्याकाळी हवामान सुसह्य राहू शकते.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता आहे. रविवारपेक्षा किमान व कमाल तापमानात किंचित वाढ झाली असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दिवसभर ऊन आणि काही प्रमाणात आर्द्रता राहील, ज्यामुळे उष्णतेचा तडाखा अधिक जाणवेल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान उष्ण व दमट राहील. पुढील काही दिवस तापमानात वाढ होत असल्याने किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस राहील. सकाळी आणि रात्री हलकी थंडी जाणवू शकते, तर दुपारी उष्णतेत वाढ होऊन उन्हाचा कडाका अधिक असेल. नागरिकांनी कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपारी बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी.
advertisement
5/5
बदलापूरमधील हवामान उष्ण आणि स्वच्छ असेल. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहील. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान कोरडे, अंशतः ढगाळ आणि सुखद राहील. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस असेल. दिवसा कडक उन्हामुळे तापमानात किंचित बदल होऊ शकतात, परंतु दिवसभर हवामान सुखद असेल. या भागात शेती कामासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: 16 फेब्रुवारीला वारं फिरलं! कोकणात यलो अलर्ट, कल्याण-डोंबिवलीत कसं असेल हवामान?