Weather Alert: महाराष्ट्रासाठी आणखी 2 दिवस धोक्याचे, 13 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 2 दिवस पाऊस सक्रीय राहणार असून 11 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत पावसाने कहर केला. राज्याच्या सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाला आहे. आता मात्र हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. 29 सप्टेंबर रोजी राज्यातली 5 जिल्ह्यांना ऑरेंज तर 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकणात पावसाचा जोर राहणार असून मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
3/7
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांत 28 सप्टेंबरला पावसाची तीव्रता अधिक राहील. नाशिकच्या घाटभागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून उर्वरित सर्व भागात यलो अलर्ट असेल. जळगावमध्ये मध्यम पावसाची शक्यता असून सतर्कतेचा कोणताही इशारा नाही.
advertisement
4/7
मराठवाड्यातील पावसाचा जोर सोमवारपासून ओसरण्याची चिन्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर वगळता कोणत्याही जिल्ह्यांला मुसळधार पावसाचा इशारा नाही. सोमवारी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. छ. संभाजीनगर वगळता जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली या सात जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल.
advertisement
5/7
पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. सोमवारी पावसाचा जोर ओसरणार असून सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. तर पुणे साताऱ्याचा घाट परिसर आणि कोल्हापूरच्या घाट भागाला यलो अलर्ट तर पुण्याच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भामधूनही पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे आहेत. विदर्भातील कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने अलर्ट दिलेला नाही. परंतु विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला झोडपल्यानंतर पाऊस आता कोकणाकडे वळला आहे. सोमवारी कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होणार असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रासाठी आणखी 2 दिवस धोक्याचे, 13 जिल्ह्यांना अलर्ट