Weather Alret : महाराष्ट्रात अखेर कोल्ड वेव्ह धडकली, आता शुक्रवारी 13 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
12 डिसेंबर रोजी राज्यातील एकूण 13 जिल्ह्यांना शीतलहरीचा इशारा देण्यात आलाय. पाहुयात राज्यामध्ये पुढील 24 तासात हवामान कसे असेल.
advertisement
1/7

राज्याच्या अनेक भागांमध्ये थंडीची तीव्र लाट असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोल्ड वेव्हचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिला आहे. 12 डिसेंबर रोजी राज्यातील एकूण 13 जिल्ह्यांना शीतलहरीचा इशारा देण्यात आलाय. पाहुयात राज्यामध्ये पुढील 24 तासात हवामान कसे असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहील, तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढं राहील. मुंबईमध्ये देखील सकाळी आणि सायंकाळच्या वेळी गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे. 12 डिसेंबर नंतर मुंबईमध्ये किमान तापमानात वाढ होणार असून गारठ्यात कमी जाणवणार आहे.
advertisement
3/7
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने थंडीसाठी कोल्ड वेव्हचा इशारा दिला आहे. 12 डिसेंबर रोजी सोलापूरला शीतलहरीचा इशारा देण्यात आलाय. तर 11 डिसेंबर रोजी पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला कोल्ड वेव्हचा अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातील किमान तापमान 9 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव या 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. नाशिकमध्ये 11 आणि 12 डिसेंबर रोजी केवळ 9 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातही थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील तब्बल पाच जिल्ह्यांना शीतलहरीचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या पाच जिल्ह्यांमध्ये किमान तापमान हे 7 ते 9 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.
advertisement
6/7
विदर्भातही थंडीची लाट कायम असून वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्याला 12 डिसेंबर साठी थंडीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नागपूर मध्ये किमान तापमान 9 अंश सेल्सिअस तर अमरावतीमध्ये 10 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा हा सात, आठ ते नऊ अंश दरम्यान आहे. थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुले व वृद्धांची काळजी घ्यावी. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alret : महाराष्ट्रात अखेर कोल्ड वेव्ह धडकली, आता शुक्रवारी 13 जिल्ह्यांना अलर्ट