TRENDING:

Weather Alert: पुढील 2 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचे, 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
Weather Alert: विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 30 जून रोजी राज्यात हवामान कसे असेल.
advertisement
1/7
पुढील 2 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचे, 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुढील दोन दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः ज्या भागांमध्ये जिथे मागील काही दिवसांपासून उघडीप होती. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/7
विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 30 जून रोजी राज्यात हवामान कसे असेल.
advertisement
3/7
पुढील 24 तासांत मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 30 जून रोजी हवामान विभागाने रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागामध्ये मुसळधार पाऊस होईल. तर पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
तर मराठवाड्यात संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने सहा जिल्ह्यांनाही यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
7/7
विदर्भाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, पूर्व विदर्भात पाऊस अधिक असणार आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुढील 2 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचे, 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल