TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रात पुढील 24 तास अवकाळी पावसाचे, हवामान खात्याचा 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
कोकणात 26 मार्च रोजी उष्णतेची लाट असेल. तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विभागानुसार राज्यात हवामान कसे असेल, पाहूयात.
advertisement
1/7
महाराष्ट्रात पुढील 24 तास अवकाळी पावसाचे, हवामान खात्याचा 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रावर दुहेरी संकट घोंघावत आहे. कोकणात 26 मार्च रोजी उष्णतेची लाट असेल. तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विभागानुसार राज्यात हवामान कसे असेल, पाहूयात.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. मुंबईत कमाल तापमान 32-36 अंश सेल्सियस तर किमान 24-27 अंश राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडेल. ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुण्यात कमाल तापमान 33-36 अंश तर किमान 18-21 अंश राहील. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घ्यावी.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये 32-35 अंश तापमान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालनामध्ये उष्ण आणि कोरडे हवामान पाहायला मिळेल. बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांसह अवकाळी पाऊस कोसळेल. ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल तापमान 38 अंश तर किमान 21-24 अंश राहील. तर यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, 26 मार्च रोजी कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात पुढील 24 तास अवकाळी पावसाचे, हवामान खात्याचा 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल