TRENDING:

हायवेवर सुसाट जात होता अन् अचानक आठवले साईबाबा, मराठी अभिनेता पहिल्यांदा पोहोचला साई चरणी, PHOTO

Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. फोटो शेअर करत त्याने भावना व्यक्त केल्यात.
advertisement
1/9
हायवेवर सुसाट जात होता अन् अचानक आठवले साईबाबा, मराठी अभिनेता पहिल्यांदा पोहोचला साई चरणी, PHOTO
गुढीपाडव्याच्या उत्साहानंतर आता रामनवमीचा सण जवळ आला असून संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.
advertisement
2/9
विशेषतः शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना दिसते. राज्याच्या विविध भागांतून तसेच देशभरातून साईभक्त पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होत आहेत.
advertisement
3/9
अशाच भक्तिमय वातावरणात एक मराठी अभिनेता अचानक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत पोहोचला. अभिनेता त्याच्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच शिर्डीला पोहोचला.
advertisement
4/9
हा अभिनेता छत्रपती संभाजीनगर येथे नाटकाचा प्रयोग पूर्ण करून नाशिककडे निघाला होता. समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना त्याच्या मनात अचानक साईबाबांच्या दर्शनाची इच्छा निर्माण झाली.
advertisement
5/9
कोणतीही पूर्वतयारी नसताना त्याने तत्काळ निर्णय घेत गाडी शिर्डीकडे वळवली आणि थेट साई चरणी जाऊन पोहोचला.
advertisement
6/9
आपण बोलत आहोत तो अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. आपल्या अभिनयाबरोबरच लेखन आणि सूत्रसंचालनासाठी ओळखला जाणारा संकर्षण सध्या 'कुटुंब किर्रतन' आणि 'नियम व अटी लागू' या नाटकात काम करतोय. या नाटकांच्या दौऱ्यांमुळे तो सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे.
advertisement
7/9
संकर्षण कऱ्हाडेनं आयुष्यात पहिल्यांदाच शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. पोस्ट शेअर करत त्यानं अनुभव शेअर केला. तो म्हणाला, "काय माझं भाग्यं. छ. संभाजीनगर चा प्रयोग करुन नाशिक कडे जातांना अचानक वाटलं साईबाबांचं दर्शन घ्यावं… समृद्धी महामार्गावरून गाडी वळवली थेड शिर्डी."
advertisement
8/9
"मी पहिल्यांदाच साई बाबांचं दर्शन घेतलं… फारंच छान वाटलं. पायी प्रवास करुन आलेले , महाराष्ट्राच्या बाहेरून वेगवेगळ्या प्रांतातून आलेले, रांगेत ऊभे असलेले साईभक्त."
advertisement
9/9
"मंदिराचा स्वच्छं परिसर, हात जोडून जय साईराम म्हणनारे सगळे कर्मचारी आणि डोळ्यांतल्या ममत्वं भावनेने भक्तांची वाट पहाणारे साईबाबा.खूपच छान वाटलं.जय साईराम."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हायवेवर सुसाट जात होता अन् अचानक आठवले साईबाबा, मराठी अभिनेता पहिल्यांदा पोहोचला साई चरणी, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल