उन्हाळ्यात शरीराला हवाय थंडावा? उसाचा नाहीतर हे 4 रस प्या, राहाल एकदम कूल
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी फळाचा किंवा उसाचा रस घेतला जातो. पण नेहमीच्या फळांचा रस पिण्यापेक्षा अशी काही झाडे आहेत त्यांच्या फळांचा रस किंवा चहा जर आपण करून पिला तर आपलं शरीर थंड राहण्यासाठी मदत होते.
advertisement
1/5

सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढलेला पाहिला मिळत आहे. उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी फळाचा किंवा उसाचा रस घेतला जातो. पण नेहमीच्या फळांचा रस पिण्यापेक्षा अशी काही झाडे आहेत त्यांच्या फळांचा रस किंवा चहा जर आपण करून पिला तर आपलं शरीर थंड राहण्यासाठी मदत होते. यामध्ये ही झाडे नेमकी कोणती आहेत? त्यांचा रस पिण्याचे फायदे काय? याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील वनस्पतीशास्त्र संशोधक हर्षवर्धन कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
advertisement
2/5
1) बेलाचे झाड : बेलाच्या झाडाला एक फळ येतं. हे फळ आपल्याला आयुर्वेदाच्या दृष्ट्याने खूप महत्त्वाचे आहे. या बेलाच्या फळाचा रस करून पिला तर शरीर थंड ठेवण्यासाठी खूप मदत होते. तर या उन्हाळ्यात तुम्ही याचा रस करून नक्कीच पिऊ शकता.
advertisement
3/5
2) जास्वंदाचे फुल : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवायला जास्वंदाचे फुल खूप मदत करतं. आपल्यापैकी अनेक जणांना चहा प्यायला आवडतो. जास्वंदाच्या फुलाचा चहा करून पिला तरी शरीर थंड राहण्यासाठी खूप मदत होते. यालाच हिबिस्कस टी असं म्हणतात. हा चहा अत्यंत आरोग्यदायी आहे.
advertisement
4/5
3) वाळ्याचे सरबत : आपण उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे सरबत पितो. पण खस सरबत याला आपण वाळ्याचे सरबत देखील म्हणतो. हे सरबत जर आपण करून पिलं तर हे देखील शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करत.
advertisement
5/5
4) लिंबाचे सरबत : आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लिंबू देखील असतात. उन्हाळ्यात लिंबू देखील शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करत. लिंबाचे सरबत जर आपण करून पिलं तरी देखील आपल्या शरीरातील उष्णता कमी करायला मदत करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात शरीराला हवाय थंडावा? उसाचा नाहीतर हे 4 रस प्या, राहाल एकदम कूल