TRENDING:

Vitamins : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेताय ? मोठ्या धोक्याला देताय आमंत्रण, प्रकृतीवर होतील गंभीर परिणाम

Last Updated:

अनेकांना दररोज व्हिटॅमिन्स घ्यावे लागतात. डॉक्टरांनी काही कारणांमुळे व्हिटॅमिन दिवसातून कितीवेळा घ्यायचं याचं प्रमाण सांगितलेलं असतं. यातलंच एक व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन बी3- नियासिन. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी हे व्हिटॅमिन महत्त्वाचं आहे. पण डॉक्टरांचा सल्ला न घेता हे व्हिटॅमिन घेतल्यानं अमेरिकेतल्या एका व्यक्तीच्या दृष्टीवर गंभीर परिणाम झाला. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विविध कारणांसाठी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेत असाल तर ही माहिती पूर्ण वाचा. कारण याचं प्रमाण चुकलं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण इथे दिलंय.
News18
News18
advertisement

अनेकांना दररोज व्हिटॅमिन्स घ्यावे लागतात. डॉक्टरांनी काही कारणांमुळे व्हिटॅमिन दिवसातून कितीवेळा घ्यायचं याचं प्रमाण सांगितलेलं असतं. यातलंच एक व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन बी3- नियासिन. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी हे व्हिटॅमिन महत्त्वाचं आहे. पण डॉक्टरांचा सल्ला न घेता हे व्हिटॅमिन घेतल्यानं अमेरिकेतल्या एका व्यक्तीच्या दृष्टीवर गंभीर परिणाम झाला.

डॉक्टर कधीकधी उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हायपरलिपिडेमिया असलेल्या रुग्णांना याची शिफारस करतात. पण, जेव्हा ही व्हिटॅमिन्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अतिरिक्त प्रमाणात घेतली जातात, तेव्हा ती हानिकारक ठरू शकतात.

advertisement

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील माउंट सिनाई नेत्र आणि कर्ण रुग्णालयातील डॉक्टरांनी अशाच एका प्रकरणाची नोंद केली आहे, ज्यात नियासिनच्या अतिसेवनामुळे एका व्यक्तीच्या दृष्टीवर परिणाम झाला. या एकसष्ट वर्षीय व्यक्तीची दृष्टी एका महिन्यात हळूहळू खालावत गेली आणि अखेरीस त्याची स्पष्ट दृष्टी गेली. त्याची दृष्टी धोकादायक पातळीपर्यंत खालावली होती, असं चाचण्यांमधून दिसून आलं.

advertisement

Health Tip : झोपेतून उठलं की सकाळी तोंडाचा वास येतो ? तोंड कोरडं वाटतं ? पाहूयात असं होण्यामागची कारणं

सुरुवातीला, रुग्णानं केवळ उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल असल्याची तक्रार केली, पण नंतर त्यानं कबूल केलं की तो अनेक महिन्यांपासून दररोज तीन ते सहा ग्रॅम नियासिन घेत होता. हृदयाचं आरोग्य सुधारेल या विश्वासानं त्यानं डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच हे सप्लिमेंट विकत घेतलं होतं.

advertisement

डॉक्टरांनी त्याच्या डोळ्यांची सखोल तपासणी केली, तेव्हा त्याला 'नियासिन-इंड्युस्ड सिस्टॉइड मॅक्युलोपॅथी' नावाचा एक दुर्मिळ आजार आहे असं त्यांना आढळलं. या आजारामुळे रेटिनामधे म्हणजेच दृष्टिपटलात द्रव जमा होतं, ज्यामुळे सूज येते आणि दृष्टी धूसर किंवा बाधित होते. सुदैवाने, रुग्णानं नियासिन घेणे थांबवताच त्याच्या स्थितीत सुधारणा झाली. एका आठवड्यात त्याची दृष्टी सुधारली आणि सुमारे दोन महिन्यांनंतर त्याची दृष्टी पूर्णपणे सामान्य झाली.

advertisement

Health Tips : हवामान बदलामुळे सर्दी खोकला झालाय ? घरातल्याच उपायांंनी त्रास होईल कमी, प्रकृतीची काळजी घ्या

डॉक्टरांच्या मते, नियासिनचा सामान्य वैद्यकीय डोस दररोज एक ते तीन ग्रॅम आहे आणि जास्तीत जास्त सहा ग्रॅम वैद्यकीय देखरेखीखाली घेतला पाहिजे. रुग्णानं वैद्यकीय देखरेखीशिवाय हे प्रमाण घेतलं होतं. तपासणीदरम्यान, आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाद्वारे मॅक्युलामधे सूज असल्याचं दिसून आलं, जो स्पष्ट दृष्टीसाठी रेटिनाचा आवश्यक असलेला एक भाग आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

हा केस रिपोर्ट 'जर्नल ऑफ व्हिट्रिओरेटिनल डिसीजेस'मध्ये प्रकाशित झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट्स घेणं धोकादायक ठरू शकतं असा इशारा संशोधन पथकाचे प्रमुख डॉ. रिचर्ड रोझेन यांनी दिला आहे.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Vitamins : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेताय ? मोठ्या धोक्याला देताय आमंत्रण, प्रकृतीवर होतील गंभीर परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल