TRENDING:

Prithvi Shaw : 4 वर्ष,7 महिने 27 दिवस टीम इंडिया बाहेर, कमबॅकवर पहिल्यांदाच पृथ्वी शॉ काय बोलला?

Last Updated:
मागच्या अनेक वर्षापासून टीम इंडियापासून दूर असलेला पृथ्वी शॉ देखील या लीगसाठी सज्ज झाला आहे.मैदानात आपलं सर्वोत्तम देण्यासाठी तो देखील सराव करतो आहे.
advertisement
1/10
 4 वर्ष,7 महिने 27 दिवस टीम इंडिया बाहेर, कमबॅकवर पहिल्यांदाच पृथ्वी शॉ काय बोलला?
आयपीएल 2026 च्या हंगामाला येत्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे. या हंगामासाठी सर्वच खेळाडू मैदानात कसून सराव करत आहेत.
advertisement
2/10
मागच्या अनेक वर्षापासून टीम इंडियापासून दूर असलेला पृथ्वी शॉ देखील या लीगसाठी सज्ज झाला आहे.मैदानात आपलं सर्वोत्तम देण्यासाठी तो देखील सराव करतो आहे.
advertisement
3/10
यंदाच्या लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला 75 लाखाच्या किमतीत ताफ्यात घेतले आहे. त्यामुळे तो दिल्लीकडून सामना खेळताना दिसणार आहे.
advertisement
4/10
पण या लीगआधी पृथ्वी शॉने त्याच्या टीम इंडियातील कमबॅकवर मोठं भाष्य केले आहे. या दरम्यान तो काय बोलला आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
5/10
कुठलीच शंका नाही आहे मी टीम इंडियात नक्कीच पुनरागमन करेन. त्यासाठी मी खेळतो आहे आणि कसून सराव करतो आहे. पूर्वी मी जेवढे प्रयत्न करायचो, त्याच्या तिप्पट प्रयत्न मी आज करत आहे, असे पृ्थ्वी शॉ म्हणाला आहे.
advertisement
6/10
सहसा मला याबद्दल बोलायला आवडत नाही.पण मला मनापासून असे वाटते की, पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्यासाठी मी केवळ 100 टक्केच नव्हे,तर 200 टक्के योगदान देत आहे, असे पृथ्वी शॉ सांगतो.
advertisement
7/10
मग तो कोणताही प्रसंग असो.एखादा चषक जिंकण्याचा प्रसंग असो, प्रत्यक्ष सामन्याचा दिवस असो,किंवा अगदी सरावाचा दिवस असो.मी प्रत्येक वेळी 200 टक्के देण्याचा प्रयत्न करतो.जर मला शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या ठीक वाटत नसेल, तर मी सराव करत नाही.
advertisement
8/10
केवळ 50 टक्के क्षमतेने सराव करून काहीच साध्य होत नाही.जर तुम्ही मैदानावर उतरला असाल,तर तुम्ही तुमचे 100 टक्के द्यायलाच हवेत.अन्यथा, तुम्ही मैदानावर येऊच नये,असेही पृथ्वी म्हणाला आहे.
advertisement
9/10
आयुष्यात जे काही चढ-उतार आले, त्या सर्वांचा सामना मी अत्यंत आदराने आणि हसतमुखाने केला. जसजसे तुम्ही वयाने आणि अनुभवाने प्रगल्भ होत जाता, तसतसे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चुकांची जाणीव होऊ लागते. ज्या गोष्टी तुम्हाला आधीच माहित असतात, त्या तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला कोणत्याही वरिष्ठांची किंवा मार्गदर्शकांची गरज भासत नाही. त्या गोष्टी तुम्ही स्वतःहूनच आधीच समजून घेतल्या आणि त्यानंतर पुढे वाटचाल केली, तर ते अधिक सोयीस्कर ठरते,असे देखील पृथ्वी म्हणाला आहे.
advertisement
10/10
दरम्यान पृथ्वी शॉच्या दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना हा 1 एप्रिल 2026 ला लखनऊ सुपर जाएटससोबत आहे.या सामन्यात पृथ्वी शॉ कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Prithvi Shaw : 4 वर्ष,7 महिने 27 दिवस टीम इंडिया बाहेर, कमबॅकवर पहिल्यांदाच पृथ्वी शॉ काय बोलला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल