TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रात आता उष्णतेची लाट, शनिवारी आणखी संकट, 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
कोकण आणि मुंबईसह पालघर, ठाणे, रायगडमध्ये उष्ण आणि दमट स्थितीचा यलो अलर्ट कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 35-39 अंशांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
1/7
महाराष्ट्रात आता उष्णतेची लाट, शनिवारी आणखी संकट, 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. 7 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकण आणि मुंबईसह पालघर, ठाणे, रायगडमध्ये उष्ण आणि दमट स्थितीचा यलो अलर्ट कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 35-39 अंशांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल 33-37 अंश सेल्सियस राहील. किमान 22-25 अंश अपेक्षित आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र राहील.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल 35-38 अंश, किमान 17-20 अंश राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये दिवसा 33-36 अंश, रात्री 18-21 अंश राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 34-36 अंशांपर्यंत, किमान 19-22 अंश राहील.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता राहील. कमाल 36-39 अंश, किमान 20-24 अंश राहील. त्यामुळे सावधगिरी बाळगावी.
advertisement
7/7
एकंदरीत, 7 मार्चला महाराष्ट्रात उन्हाळ्याचा जोरदार चटका जाणवत आहे. नागरिकांनी भरपूर द्रवपदार्थ घ्या, सूर्यप्रकाश टाळा आणि उष्णतेच्या लक्षणांवर लक्ष ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात आता उष्णतेची लाट, शनिवारी आणखी संकट, 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल