TRENDING:

पिंपरी-चिंचवडमधील 2 लाख रेशनकार्ड रद्द, तुमचं तर नाव नाही? रद्द झालं तर काय करायचं?

Last Updated:
पिंपरी-चिंचवडमध्ये शिधापत्रिका पडताळणीत १.२२ लाख नागरिकांचे रेशन बंद, अपात्र लाभार्थ्यांना वगळले. EKYC ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण न केल्यास रेशनकार्ड बंद होऊ शकते.
advertisement
1/6
पिंपरी-चिंचवडमधील 2 लाख रेशनकार्ड रद्द, तुमचं तर नाव नाही?
चुकीची माहिती देणे आणि कागदपत्रांमधील त्रुटी यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल सव्वा दोन लाख नागरिकांचे रेशन बंद करण्यात आलं. अन्न व नागरी पुरवठा विभागाने राबवलेल्या शिधापत्रिका पडताळणी मोहिमेत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. यामध्ये तुमचं रेशनकार्ड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
advertisement
2/6
या पडताळणी मोहिमेत आजमितीस २२ हजार ६९६ शिधापत्रिकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पिंपरी विभागातील ७२,२५६, चिंचवडमधील ८२,५६९ आणि भोसरीमधील ६७,७७२ नागरिकांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
3/6
पडताळणीदरम्यान अनेक कुटुंबांनी त्यांचे उत्पन्न वाढल्याचे मान्य केले. काही शिधापत्रिकांमध्ये गंभीर विसंगती, चुकीचे पत्ते किंवा अपूर्ण माहिती आढळली. शहराबाहेर स्थलांतरित होऊनही अनेकांच्या नावावर शिधापत्रिका सक्रिय असल्याचे आढळले. अशा सर्व प्रकारांमुळे प्रशासनाने कारवाई करत, या लोकांना योजनेबाहेर केले आहे.
advertisement
4/6
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अपात्र लाभार्थ्यांना वगळल्यामुळे आता पात्र आणि गरजू कुटुंबांना अधिक धान्याचा वाटा उपलब्ध होणार आहे. या कारवाईमुळे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढेल, असा दावा प्रशासनाने केला आहे. शहरातील गरीब कुटुंबांना न्याय मिळेल आणि पात्र लाभार्थ्यांना धान्याचा पूर्ण वाटा मिळेल, असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.
advertisement
5/6
ज्या नागरिकांना वाटते की पात्रतेसंदर्भात त्यांच्यावर झालेला निर्णय चुकीचा आहे, त्यांनी निराश न होता जवळच्या रेशन दुकानात संपर्क साधावा. कागदपत्रांसह पुनर्पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, अंमलबजावणी प्रक्रिया सुरू असल्याने पात्र असणारे नागरिकही मागे राहण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
तुम्ही अजूनही E KYC केलं नसेल तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तुम्ही लगेच EKYC करुन घ्या. नाहीतर तुमचं नावही यामधून वगळलं जाण्याची शक्यता आहे. 31 डिसेंबरआधी EKYC पूर्ण करा. नाहीतर रेशनकार्ड बंद होऊ शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पिंपरी-चिंचवडमधील 2 लाख रेशनकार्ड रद्द, तुमचं तर नाव नाही? रद्द झालं तर काय करायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल