Pune Election : पुण्यात रंगणार 'धंगेकर विरुद्ध आंदेकर' सामना, वनराजच्या पत्नीसमोर रविंद्र धंगेकरांची बायको, सोनालीला जामीन मिळणार?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
PMC Election Sonali Andekar vs Pratibha Dhangekar : एका बाजूला शिवसेनेची ताकद आणि रवींद्र धंगेकर यांचा जनसंपर्क आहे, तर दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी वर्तुळातील आंदेकर घराण्याला मानणारा वर्ग या प्रभागात आहे.
advertisement
1/7

पुणे महानगरपालिका निवडणुकीत आता चुरशीच्या फाईट पहायला मिळत आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता पुण्यातील विविध प्रभागातील चित्र स्पष्ट झालं आहे.
advertisement
2/7
अशातच आता पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये तगडी फाईट पहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 23 मध्ये आता धंगेकर विरुद्ध आंदेकर असा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.
advertisement
3/7
शिवसेनेकडून रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोनाली आंदेकर यांना उमेदवारी दिली आहे.
advertisement
4/7
सोनाली आंदेकर या मयत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी असून, त्या प्रभाग क्रमांक 23 मधून आपले नशीब आजमावत आहेत. सध्या त्या तुरूंगात आहेत.
advertisement
5/7
या दोन महिला उमेदवारांमुळे पुण्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. एका बाजूला शिवसेनेची ताकद आणि रवींद्र धंगेकर यांचा जनसंपर्क आहे. त्यामुळे प्रतिभा यांचं पारडं जड दिसतंय.
advertisement
6/7
तर दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी वर्तुळातील आंदेकर घराण्याला मानणारा वर्ग या प्रभागात आहे. या बिग फाईटमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलाय.
advertisement
7/7
आयुष कोमकर हत्या प्रकरणात जेलमध्ये असणाऱ्या सोनाली आंदेकरला तिकीट मिळाल्याने प्रतिभा धंगेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच आता सोनाली आंदेकरला प्रचारासाठी जामीन मिळणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Election : पुण्यात रंगणार 'धंगेकर विरुद्ध आंदेकर' सामना, वनराजच्या पत्नीसमोर रविंद्र धंगेकरांची बायको, सोनालीला जामीन मिळणार?