pune : 13 वर्षांचं प्रेम अन् विजयचा झाला गेम, सगळ्यांना वाटलं कोयत्या गँगनं मारलं, पण सुजाताने पुणे हादरवलं!
- Published by:sachin Salve
Last Updated:
खरंतर विजय ढुमे आणि सुजाताचे 13 वर्षांपासून अनैतिक संबंध होते, अगदी खुनाच्या दिवशीही ते दोघं एकमेकांना भेटले होते. त्यानंतर तिनेच मारेकऱ्यांना ढुमेचं लोकेशन सांगितल्याचं तपासात समोर आलंय. (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी)
advertisement
1/8

पिंपरीतील लाईनबॉय विजय ढुमे याच्या खूनाचा अखेर उलगडा झाला आहे. सुजाता ढमाल या त्याच्या जुन्या प्रेयसीनेच त्याचा काटा काढल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. आपल्या नव्या प्रियकराकरवीच तिने ढुमेचा गेम वाजवल्याने गुन्हेगारी जगतात चांगलीच खळबळ माजलीय. कारण विजय ढुमे याचे गुन्हेगारी जगत, पोलीस अधिकारी, नेतेमंडळी अशा सर्वांशीच संबंध होते.
advertisement
2/8
पुण्याचा लाईनबॉय विजय ढुमे... याचा ऐन विसर्जन मिरवणूक संपताच खून झाल्याने मोठी खळबळ माजली होती. कारण ढुमे वरकरणी हॉटेल व्यावसायिक असला तरी लायझिंगची कामे करायचा, त्यातून त्याचे कुख्यात गुन्हेगार, पोलीस अधिकारी, पुढारी अशा सर्वांशीच उठबस होती. म्हणूनच जमीन व्यवहार अथवा पैशांच्या देवाणघेवाणीतून त्याचा खून झाला नाही ना अशी शंका अनेकांना वाटत होती.
advertisement
3/8
पण पोलिसांच्या तपासाचे धागेदोरे थेट त्याची जुनी प्रेयसी सुजाता ढमाल हिच्यापाशीच जाऊन जुळू लागल्याने पोलिसांनीही कसून चौकशी करताच तीने गुन्हा कबुल केला.
advertisement
4/8
या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी 60-70 सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसंच फोनचे सीडीआरही तपासले. विजय ढुमे हा त्याची जुनी प्रेयसी सुजाताला अलीकडे जरा त्रास देत असल्याने तिने तिचा नवा प्रियकर संदीप तुपे याच्याकरवी ढुमेचा काटा काढल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.
advertisement
5/8
या प्रकरणात सुजाता समीर ढमाल, संदीप दशरथ तुपे (वय 23), सागर संजय तुपसुंदर (वय 19), प्रथमेश रामदास खंदारे (28) आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शुक्रवारी रात्री क्वालिटी इन लॉजच्या परिसरात विजय ढुमे याचा डोक्यात सळईने वार करून खून करण्यात आला होता.
advertisement
6/8
म्हणून काढला विजयचा काटा? - लाईन बॉय असलेल्या विजय ढुमे याचे पोलिसांशी चांगले संबंध होते. गेल्या 13 वर्षांपासून विजयचे आणि सुजाताचे प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे, सुजाताचं लग्न झालं आहे. सुजाताला बाऊन्सरची नोकरी करायची होती. त्यासाठी ती प्रयत्न करत होती. 4 महिन्यापूर्वी तिची आरोपी तुपेशी सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
advertisement
7/8
तुपे आणि सुजाताच्या प्रेमात आता विजय ढुमे अडथळा ठरत होता. त्यामुळे नवीन प्रियकर तुपे आणि सुजाताने विजयाला बाजू करण्याचा कट रचला. क्वालिटी इन लॉजच्या परिसरात विजय जात होता, तेव्हा तुपे आणि त्याचे साथीदार लॉजजवळ दबा धरून बसले होते. विजय जसा लॉजच्या बाजूला गेला तेव्हा पाठीमागून येऊन तुपे आणि त्याच्या साथीदारांनी विजयवर हल्ला केला. लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात वार करण्यात आले होते. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
8/8
खरंतर ढुमे आणि सुजाताचे 13 वर्षांपासून अनैतिक संबंध होते, अगदी खुनाच्या दिवशीही ते दोघं एकमेकांना भेटले होते. त्यानंतर तिनेच मारेकऱ्यांना ढुमेचं लोकेशन सांगितल्याचं तपासात समोर आलंय. पण ढुमे याचा लायझिंगसह इतर क्षेत्रातील वावर बघता या गुन्ह्याचे आणखी काही पदर पोलीस तपासात समोर येतात का? हे पाहण्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
pune : 13 वर्षांचं प्रेम अन् विजयचा झाला गेम, सगळ्यांना वाटलं कोयत्या गँगनं मारलं, पण सुजाताने पुणे हादरवलं!