धक्कादायक! पुण्यात PMP ने 50 प्रवासी करत होते प्रवास, अचानक धावत्या बसने घेतला पेट अन् काहीच क्षणात संपूर्ण बसचा कोळसा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
तळवडे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या प्लांटजवळ एका चालत्या बसला अचानक भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते.
advertisement
1/7

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसला आग लागण्याचे सत्र थांबता थांबत नाहीये. तळवडे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या प्लांटजवळ एका चालत्या बसला अचानक भीषण आग लागली.
advertisement
2/7
काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
advertisement
3/7
मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते. बस तळवडे परिसरातून जात असताना इंजिनच्या भागातून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.
advertisement
4/7
चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी होते. आगीचे स्वरूप पाहता, बसमधील कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी तातडीने खाली उड्या घेतल्या. प्रवाशांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
5/7
आगीच्या ज्वाला इतक्या उंच होत्या आणि धुराचे लोट इतके गडद होते की लांबूनही हे दृश्य दिसत होते. यामुळे स्थानिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
advertisement
6/7
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसचा सांगाडाच शिल्लक राहिला होता.
advertisement
7/7
बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, भररस्त्यात बस अशा प्रकारे पेट घेत असल्याने PMPML बसच्या देखभालीवर प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
धक्कादायक! पुण्यात PMP ने 50 प्रवासी करत होते प्रवास, अचानक धावत्या बसने घेतला पेट अन् काहीच क्षणात संपूर्ण बसचा कोळसा