Pune Weather: चैत्रातच पेटला वैशाख वणवा, पुण्यानं तापमानात विदर्भाला टाकलं मागं, आज पुन्हा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Weather Alert: गेल्या काही दिवसांत पुण्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुण्याच्या तापमानानं यंदा विदर्भालाही मागं टाकल्याचं चित्र आहे.
advertisement
1/5

राज्यात सध्या उष्णतेची लाट तीव्र होत चालली असून पुण्यात तापमान झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे पुण्यानं तापमानाच्या बाबतीत यंदा विदर्भाला देखील मागं टाकल्याचं चित्र आहे.
advertisement
2/5
दरवर्षी चैत्रानंतर येणाऱ्या वैशाख महिन्यात तापमानात मोठी वाढ होते. मात्र, यंदा चैत्रातच वणवा पेटल्याचं चित्र असून तापमानाच्या नोंदी पाहून पुणेकरांची झोप उडणार आहे. पुण्यातील लोहगाव परिसरात सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय.
advertisement
3/5
पुण्यातील लोहगाव परिसरात गुरुवारी उच्चांकी 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाले. हे पुण्यातील आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान ठरलंय. तर पुणे शहरातील इतर भागात देखील पारा चाळीशी पार कायम आहे.
advertisement
4/5
पुण्यात आज पुन्हा उष्णतेचा पारा चढाच राहणार आहे. पुढील काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/5
उन्हाळ्याच्या या वाढत्या लाटेमुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दुपारच्या वेळेस शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलक्या कपड्यांचा वापर करावा आणि थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Weather: चैत्रातच पेटला वैशाख वणवा, पुण्यानं तापमानात विदर्भाला टाकलं मागं, आज पुन्हा अलर्ट