Pune Annayog Cafe : पुण्यामध्ये कोरियन संस्कृतीची मेजवानी, दक्षिण कोरियाच्या व्यक्तीची पुणेकरांवर भुरळ
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Annayong Cafe : कोरियाचे देगूक बे आणि औरंगाबादच्या डॉ. मयुरी भालेराव या दाम्पत्याने पुण्यात सुरू केलेला कोरियन कॅफे सध्या खूप लोकप्रिय होत आहे. पुणेकरांना अनोख्या कोरियन संस्कृतीचा आणि खाद्यपदार्थांचा अनुभव मिळत आहे.
advertisement
1/5

कोरियाचे देगूक बे आणि औरंगाबादच्या डॉ. मयुरी भालेराव या दाम्पत्याने पुण्यात सुरू केलेला कोरियन कॅफे सध्या खूप लोकप्रिय होत आहे. पुणेकरांना अनोख्या कोरियन संस्कृतीचा आणि खाद्यपदार्थांचा अनुभव मिळत आहे.
advertisement
2/5
देगूक हे मूळचे दक्षिण कोरियातील असून ते संस्कृत शिकण्यासाठी भारतात आले होते. तर डॉ. मयुरी या औरंगाबादच्या रहिवासी असून त्या कोरियन भाषा शिकत होत्या. याच दरम्यान, एका ऑनलाइन लँग्वेज लर्निंग प्लॅटफॉर्मवर त्यांची ओळख झाली.
advertisement
3/5
आधी ओळख आणि नंतर ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. जरी घरच्यांचा सुरुवातीला विरोध होता, तरी त्यांनी समजावून सांगून कुटुंबाची मर्जी मिळवली. आज दोघेही आनंदाने पुण्यात स्थायिक झाले आहेत.तीन वर्ष झालं त्यांच लग्न झालं आहे. तर मागील एक वर्षा पासून कॅफे चालवत आहेत.
advertisement
4/5
लग्नानंतर देगूक यांनी आपले एक स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात कोरियन कॅफे सुरू करण्याचा. बाणेर परिसरात ‘कॅफे अन्नयोंग’ या नावाने त्यांनी एक वर्षापूर्वी कॅफे सुरू केला.
advertisement
5/5
पुण्यातील नागरिक या कॅफेला भेट देत असून कोरियन खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेत आहेत. पारंपरिक पदार्थांपासून कोरियन शैलीतील पेयांपर्यंत अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Annayog Cafe : पुण्यामध्ये कोरियन संस्कृतीची मेजवानी, दक्षिण कोरियाच्या व्यक्तीची पुणेकरांवर भुरळ