TRENDING:

Weather Update : आज या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसासोबत आणखी एक संकट, IMD कडून हायअलर्ट

Last Updated:
Rain Alert in Maharashtra : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7
आज या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसासोबत आणखी एक संकट, IMD कडून हायअलर्ट
मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होईल, तसंच सामान्यतः ढगाळ आकाश राहील.इथे कमाल आणि किमान तापमान 30°C आणि 26°C च्या आसपास राहील.
advertisement
2/7
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, कोकण-गोव्यातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
3/7
या जिल्ह्यांमध्ये पावसासह आणखी एका संकटाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण- गोव्यात पावसासोबतच विजांच्या कडकडाटाचाही सामना नागरिकांना करावा लागू शकतो.
advertisement
4/7
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
सिंधुदूर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यातही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
advertisement
6/7
पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून याठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुण्यात ढगाळ वातावरण राहणार इथलं तापमान 30°C कमाल आणि 21°C किमान असेल.
advertisement
7/7
विदर्भाला हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. इथल्या बहुतांश पुढचे 5 दिवस पावसाची शक्यता आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तविली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Update : आज या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसासोबत आणखी एक संकट, IMD कडून हायअलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल