Weather Alert: 11 ते 4 घरातच थांबा, पश्चिम महाराष्ट्रावर सूर्याचा प्रकोप, पाहा आजचं हवामान
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather update: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुण्यात हंगामातील सर्वाधिक तापमानांची नोंद झाली आहे.
advertisement
1/7

राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने चांगलीच उसळी घेतली आहे. सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भ होरपळून निघत आहे. अकोला येथे यंदाच्या हंगामातील राज्याच्या उच्चांकी 44.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील उष्णतेचा पारा चढत आहे. पुढील 24 तासांतील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/7
8 एप्रिल रोजी पुण्यातील लोहगाव स्थानकात या हंगामातील सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस तापमान वाढ कायम असून आयएमडीने रहिवाशांना सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. आज पुण्यातील कमाल तापमान 40 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
3/7
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. आजरा परिसरात पावसाने हजेरी लावली असली तरी उष्म्यात वाढ होत आहे. सकाळी उन्हाच्या झळा तर दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. वातावरणात उष्मा कमालीचा जाणवत असून येथील कमाल तापमान 39 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
4/7
सोलापूर जिल्ह्यातील उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होत आहे. येथील कमाल तापमान 42 तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके राहील. तसेच एक दोन वेळा गडगडाटी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/7
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहिल. जिल्ह्यात उकाडा वाढत असला तरी दुपारनंतर ढगाळ वातावरणाने आणि तुरळक हलक्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होत आहे.
advertisement
6/7
सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 39 अन सेल्सिअस तर किमान तापमान 22 असेल इतके राहील. सातारा जिल्ह्यात देखील दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आता पुन्हा उष्णता वाढत आहे. तर काही जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: 11 ते 4 घरातच थांबा, पश्चिम महाराष्ट्रावर सूर्याचा प्रकोप, पाहा आजचं हवामान