Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर दुहेरी संकट, 24 तास धोक्याचे, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मंगळवारी वादळी पाऊस झाला. पुढील 24 तासांतील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7

सूर्य आग ओकत असल्याने उन्हाच्या झळांनी राज्य भाजून निघत आहे. विदर्भात उन्हाचा चटका अधिक असून, मंगळवारी चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी 45.6 अंश तापमानाची नोंद झाली. आज 23 एप्रिल रोझी विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रात देखील उन्हाचा पारा चढाच राहणार आहे. पुढील 24 तासांचा हवामान आणि तापमान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
गेल्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 21.0 ते 43.0 अंश सेल्सिअस दरम्यान राहीले होते. सोलापूर जिल्हा सर्वाधिक उष्ण ठरत असून मंगळवारी सोलापूर मध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासातील कमाल तापमान 43 अंशावर तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील. उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढले आहेत. मागील 24 तासात पुण्यातील कमाल तापमान 39.9 तर किमान तापमान 22.0 अंशावर राहिले. पुढील 24 तासात पुण्यातील उष्णता कायम राहणार असून पारा 40 अंशावर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी ढगाळ हवामान असल्याने तापमानात अंशतः घट दिसून आली. कमाल तापमान 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रात्री काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पुढील 24 तास कोल्हापुरातील तापमान 38 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
सातारा जिल्ह्यातील चांगलाच कडाडलेला पारा अंशतः घटला आहे. मागील 24 तासात सातारा जिल्ह्यात 39.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज साताऱ्यातील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात पुढील 24 तासांत किमान तापमान 40 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस राहिल. मागील 24 तासात सांगली जिल्ह्यात 37.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपीट झाली.
advertisement
7/7
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रावर सध्या दुहेरी संकट घोंघावत आहे. एकीकडे उष्मतेचा पारा चढलेला असतानाच अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तर नागरिकांना देखील आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर दुहेरी संकट, 24 तास धोक्याचे, हवामान विभागाचा अलर्ट