Weather Alert: काळजी घ्या! पुणे ते कोल्हापूर हायअलर्ट, या भागात अतिमुसळधार, आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. आज पुणे ते कोल्हापूर घाटमाथा भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7

बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. आज 16 ऑगस्ट रोजी मुंबईसह काही जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यामाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात पावसाची पावसाची उघडीप राहिली. तसेच कमाल तापमानाचा पारा 27.2 अंश सेल्सिअसवर राहिला. पुढील 24 तासात पुणे जिल्ह्यात विजांसह मध्यम पावसाची शक्‍यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. यावेळी कमाल तापमान 28 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात 0.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहिल. सातारा घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 24.3 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 28 अंशावर राहिल. कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 28.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 29 अंशावर राहिल. सोलापूर जिल्ह्यात एक दोन वेळा गडगडाटी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
6/7
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 28 तर कमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
दरम्यान, कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा येथे जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: काळजी घ्या! पुणे ते कोल्हापूर हायअलर्ट, या भागात अतिमुसळधार, आजचा हवामान अंदाज