Daily Aries Horoscope: मेष राशीच्या व्यक्तींसाठी दिवस जरा अडचणींचा, बुडू शकतात पैसे, काळजी घ्यावी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Daily Aries Horoscope in Marathi: आपला वर्तमानकाळ, भूतकाळ कसा असणार हे आपल्या कर्मांवर अवलंबून असतंच, परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं की, आपल्या पत्रिकेतील ग्रह-ताऱ्यांचाही यात महत्त्वाचा वाटा असतो. सर्व ग्रह, तारे, नक्षत्र वेळोवेळी त्यांची चाल, स्थिती बदलतात. त्यावरूनच ठरतं की, कोणासाठी कोणता दिवस कसा जाणार. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5

आज 13 जानेवारी, आठवड्यातला पहिला सोमवार आणि मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस. काही राशींसाठी आजचा दिवस प्रचंड लाभदायी असेल, परंतु काही राशींच्या व्यक्तींना मात्र अडचणी सोसाव्या लागू शकतात.
advertisement
2/5
अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस करियर, प्रेम आणि पैशांबाबत जरा चढ-उताराचा असण्याची शक्यता आहे. परंतु संध्याकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल. त्यामुळे दिवसभरात अत्यंत काळजी घ्यावी.
advertisement
3/5
मेष राशीच्या व्यक्तींसाठी करियरबाबत आजचा दिवस चढ-उताराचा असला तरी आपण आपलं धैर्य विसरू नये, त्याच्या दिशेनं वाटचाल सुरू ठेवावी. आज गुंतवणूक करायची असेल तर खूप विचारपूर्वक करावी, कारण त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे, असं ज्योतिषांनी सांगितलंय.
advertisement
4/5
प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस जरा अडचणींचा आहे. जोडीदारासोबत भांडण होऊ शकतं. लव्ह लाइफमध्ये काहीसा बदल अनुभवायला मिळू शकतो. याबाबतही जरा धिरानं घ्यावं. तसंच मेष राशीच्या व्यक्तींना आज आरोग्य उत्तम साथ देईल, परंतु बाहेरचे पदार्थ खाल्ल्यास त्रास होऊ शकतो, असं ज्योतिषी म्हणाले.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Daily Aries Horoscope: मेष राशीच्या व्यक्तींसाठी दिवस जरा अडचणींचा, बुडू शकतात पैसे, काळजी घ्यावी!