संध्याकाळी चुकूनही दान करू नयेत 'या' 3 सफेद वस्तू, सात जन्म पाठलाग नाही सोडणार गरिबी!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रामध्ये दानधर्माला अत्यंत महत्त्व दिले आहे. दान केल्याने केवळ पुण्य मिळत नाही, तर ग्रहांचे दोषही दूर होतात. मात्र, शास्त्रात दानाचे काही कडक नियमही सांगितले आहेत. विशेषतः सूर्यास्तानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी काही विशिष्ट वस्तूंचे दान करणे वर्ज्य मानले जाते.
advertisement
1/7

2/7
असे मानले जाते की, संध्याकाळी लक्ष्मीचे आगमन घरामध्ये होत असते. अशा वेळी घराची 'बरकत' मानल्या जाणाऱ्या पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने लक्ष्मी माता नाराज होते आणि घरात दरिद्रता येते. जाणून घेऊया अशा कोणत्या 3 पांढऱ्या वस्तू आहेत, ज्यांचे दान संध्याकाळी करणे टाळावे.
advertisement
3/7
दूध आणि दही: दूध आणि दही या दोन्ही वस्तूंचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी आहे. शुक्र हा धन आणि वैभवाचा कारक मानला जातो. संध्याकाळी कोणालाही दूध किंवा दही दान केल्याने घरातील सुख-समृद्धी कमी होते आणि आर्थिक अडथळे निर्माण होतात.
advertisement
4/7
मीठ: मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते. वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळच्या वेळी शेजाऱ्यांना किंवा कोणाही बाहेरील व्यक्तीला मीठ दिल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते. यामुळे घरामध्ये कर्जाचा डोंगर वाढू शकतो आणि कुटुंबात वादाचे प्रसंग उद्भवतात.
advertisement
5/7
तांदूळ: तांदूळ हे अक्षत मानले जातात आणि त्यांचा संबंध चंद्राशी असतो. सूर्यास्तानंतर तांदळाचे दान केल्याने कुंडलीत चंद्रदोष निर्माण होतो. यामुळे मानसिक अशांती लाभते आणि विनाकारण होणाऱ्या खर्चात वाढ होते.
advertisement
6/7
लक्ष्मीचे आगमन: संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची असते, म्हणून या वेळी कोणालाही उधार किंवा दान देणे टाळावे. शक्य असल्यास सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे उसने देऊ नका, यामुळे दिलेला पैसा परत येण्यात अडचणी येतात.
advertisement
7/7
कचरा बाहेर टाकू नका: संध्याकाळी घर झाडू नये किंवा घरातील कचरा बाहेर फेकू नये, यामुळे घराची लक्ष्मी बाहेर जाते अशी धारणा आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
संध्याकाळी चुकूनही दान करू नयेत 'या' 3 सफेद वस्तू, सात जन्म पाठलाग नाही सोडणार गरिबी!