ज्याची वर्षानुवर्षे वाट पाहिलीत ते घडलंय! 3 राशींचं नशीब नवरात्रीत नकळत उजळलंय
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
9 एप्रिलला गुढीपाडवा झाला आणि सर्वांनी धुमधडाक्यात नव्या वर्षाचं स्वागत केलं. त्याबरोबरच सुरू झाला चैत्र नवरात्रोत्सव. या नवरात्रीत अत्यंत शुभ ग्रहांची युती झाली. जेव्हा 2 ग्रह एका राशीत येतात तेव्हा त्या ग्रहांची युती झाली असं म्हणतात. चैत्र नवरात्रीत नेमक्या कोणत्या ग्रहांची युती झाली आणि त्यातून कोणाच्या वाट्याला सुख आलं याबाबत झारखंडमधील देवघरचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी माहिती दिली आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5

सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानलं जातं. त्याचा सकारात्मक प्रभाव ज्या राशींवर पडतो, त्या राशींचं नशीब अक्षरश: उजळून निघतं. आता सूर्याचाच राशीप्रवेश झाला आहे. सूर्याने 13 एप्रिलच्या रात्री मेष राशीत प्रवेश केला. तिथं गुरू ग्रह आधीपासूनच विराजमान होता. गुरू हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. त्यामुळे सूर्य आणि गुरूची युती ही नवम पंचम राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोगासमान मानली जाते. नवरात्रीत या युतीमुळे 3 राशींचं नशीब उजळलंय. आता पुढील काही दिवस या राशीच्या व्यक्तींसाठी भरभराटीचे असणार आहेत.
advertisement
2/5
मेष : सूर्य आणि गुरू ग्रहाची युती याच राशीत झाल्यामुळे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आपल्या अडचणी आता संपण्याच्या मार्गावर आहेत. लहान-मोठ्या आजारांपासून आपली सुटका होईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागेल. रोजगाराच्या शोधात असाल तर आता यश मिळेल. आर्थिक स्थितीही सुधारेल, कर्जमुक्ती होण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्स वाढेल.
advertisement
3/5
कर्क : आपल्याला वडिलोपार्जित मालमत्तेबाबत मोठा लाभ होणार आहे. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. जोपर्यंत सूर्य आणि गुरूची युती असेल तोपर्यंत आपण निरोगी राहाल. करियर आणि व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणुकीसाठी हा कालावधी उत्तम आहे. त्यातून भरपूर नफा मिळेल. इतरांकडे अडकलेले आपले पैसे आता परत मिळतील.
advertisement
4/5
तूळ : सूर्य-गुरूच्या यूतीमुळे आपल्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी परिस्थिती असेल. ज्यामुळे बचत वाढेल. कुटुंबात शुभकार्य पार पडेल. वडिलांच्या साथीने थांबलेली कामं मार्गी लागतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास त्यातून चांगला नफा होईल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. समाजात आपला मान-सन्मान वाढेल.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
ज्याची वर्षानुवर्षे वाट पाहिलीत ते घडलंय! 3 राशींचं नशीब नवरात्रीत नकळत उजळलंय