Dussehra 2024: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पानं का वापरतात? हे कारण कोणालाच माहित नसेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
तुम्ही कधी विचार केला आहे का की दसऱ्याला आपट्याची पानेच का लुटली जातात, त्या जागी इतर झाडांची पाने का वापरली जात नाहीत? तर यामागे एक अख्यायिका आहे.
advertisement
1/10

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी सत्याचा असत्यावरील विजय साजरा केला जातो. यालाच विजयादशमी असेही म्हटले जाते.
advertisement
2/10
नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. यानंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांचे पूजन देखील केले जाते.
advertisement
3/10
दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटण्यालाही खास महत्त्व आहे. सोन्याच्या रूपात आपट्याची पाने लुटली जातात आणि हीच पाने एकमेकांना देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात.
advertisement
4/10
मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की दसऱ्याला आपट्याची पानेच का लुटली जातात, त्या जागी इतर झाडांची पाने का वापरली जात नाहीत? तर यामागे एक अख्यायिका आहे. धर्म अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
5/10
श्रीरामांचा जन्म रघुकुलात झाला. रघकुलातील श्रीरामांच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली. ती त्यांनी दान देखील केली. त्यानंतर त्यांनी वानप्रस्थ आश्रम स्विकारला. हे राजे जंगलात राहत असताना त्यांचे कुलगुरू कौत्स मूनी तिथं आले. त्यांनी त्या राजांकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रा दान म्हणून मागितली.
advertisement
6/10
वास्तविक ते राजे तेव्हा वानप्रस्थ आश्रमात होते. त्यांच्याकडे एक रूपया देखील नव्हता. तरीही गुरूंची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्राला युद्धाचं आव्हान दिलं. त्या युद्धात इंद्राचा पराभव झाला.
advertisement
7/10
त्या युद्धात इंद्राचा पराभव झाला. त्यानंतर त्या राजांनी मला तुमचं राज्य नको, 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत अशी मागणी इंद्राकडे केली. तेव्हा इंद्रानी पृथ्वीवरील आपट्याच्या झाडावर आम्ही सुवर्ण मुद्रा सोडतो. त्या तुम्ही वेचून घ्या, असे सांगितले.
advertisement
8/10
त्याप्रमाणे भगवान इंद्रानी आपट्याच्या पानांच्या रूपाने सुवर्ण वर्षाव केला. त्यामुळे आपट्याचे पान आपण विजयदशमीला लुटतो आणि ते सुवर्णाचे प्रतिक आहे, अशी अख्यायिका सांगितली जाते.
advertisement
9/10
दसऱ्याची दिवशी शस्त्रांचे पूजन केले जाते. या दिवशी केलेले शस्त्रपूजन आपल्याला कायमस्वरूपी यश आणि विजय देणारे ठरते, अशी श्रद्धा आहे. दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी 2 वाजून 3 मिनिटांपासून ते 2 वाजून 49 मिनिटांपर्यंत असेल.
advertisement
10/10
त्याचबरोबर या दिवशी बुद्धीची देवता म्हणून माता सरस्वतीची पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी सोन खरेदी केलं तर ते उत्तरोत्तर वाढत जातं, ते कधीच विकायची वेळ येत नाही, असं शास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे दसरा हा सण सुवर्ण, समृध्दी आणि आनंद देणारा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Dussehra 2024: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पानं का वापरतात? हे कारण कोणालाच माहित नसेल