TRENDING:

फिश टॅंकमध्ये शोभेचे नाही, 'शुभ' मासे ठेवावे! तरच होऊ शकते घराची भरभराट

Last Updated:
अनेकजण सजावटीसाठी घरात माशांची टाकी म्हणजेच फिश टॅंक ठेवतात. तुम्हाला माहितीये का, हे फिश टॅंक केवळ शोभेसाठी नसतं, तर पोहता मासा हा घराच्या समृद्धीसाठी शुभ मानला जातो. त्यातही काही माशांमुळे घराची अगदी भरभराट होते. घरापासून नकारात्मक ऊर्जा कोसो दूर राहते. हे मासे नेमके कोणते आहेत याबाबत ज्योतिषी विनोद पांडे यांनी माहिती दिली आहे. (रजत भट्ट, प्रतिनिधी)
advertisement
1/5
फिश टॅंकमध्ये शोभेचे नाही, 'शुभ' मासे ठेवावे! तरच होऊ शकते घराची भरभराट
ड्रॅगन फिश हा अत्यंत लोकप्रिय मासा आहे. या माशाला धन, शक्ती आणि आरोग्याचा कारक मानलं जातं. म्हणूनच लोक त्याच्यासाठी लाखो आणि कोट्यवधी रुपयेही मोजतात.
advertisement
2/5
काळ्या माशांना शुभ मानतात, कारण हे मासे नकारात्मकता दूर करून घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. म्हणूनच हे मासे आवर्जून पाळले जातात.
advertisement
3/5
गोल्डन फिश दिसायला अतिशय सुंदर दिसतंच, शिवाय या माशाला शांतीचं प्रतीकही मानलं जातं. या माशामुळे घरातलं वातावरण शांतीपूर्ण आणि सकारात्मक राहतं. या माशाची किंमत जवळपास 2 लाख रुपये एवढी असते.
advertisement
4/5
गप्पी मासेसुद्धा दिसायला सुंदर दिसतात. हे मासे पाळण्यासाठी त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. ते विशेषतः त्यांच्या रंगांसाठी ओळखले जातात. हे मासे सापासोबत मिठाच्या पाण्याच्या टॅंकमध्ये ठेवले जातात. या माशांमुळे घरातलं वातावरण <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/3-lucky-plants-for-home-can-bring-happiness-to-home-l18w-mhij-1198330.html">सुख-समृद्धी</a>चं राहतं.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/meanings-of-dreams-about-horses-mhij-1198429.html">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/religion/mobile-wallpaper-for-good-luck-and-success-mhij-1198336.html">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
फिश टॅंकमध्ये शोभेचे नाही, 'शुभ' मासे ठेवावे! तरच होऊ शकते घराची भरभराट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल