कर्जाच्या विळख्यातून झटपट होईल सुटका, आज शिवलिंगावर अर्पण करा 'ही' 1 वस्तू!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा घर, गाडी किंवा व्यवसायासाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागते. मात्र, काही वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की कर्जाचे हप्ते फेडणे कठीण होऊन बसते आणि माणूस मानसिक तणावाखाली येतो.
advertisement
1/7

आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा घर, गाडी किंवा व्यवसायासाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागते. मात्र, काही वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की कर्जाचे हप्ते फेडणे कठीण होऊन बसते आणि माणूस मानसिक तणावाखाली येतो. जर तुम्हीही अशाच आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तर 15 फेब्रुवारी 2026 रोजी येणारी महाशिवरात्री तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्रानुसार, उसाचा रस हा समृद्धी आणि गोडव्याचे प्रतीक मानला जातो. भगवान शिव हे 'आशुतोष' आहेत, जे भक्तांच्या थोड्याशा सेवेनेही प्रसन्न होतात. शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करण्याला 'ऊसाभिषेक' म्हटले जाते. उसाचा रस हा माता लक्ष्मीचा प्रिय मानला जातो, त्यामुळे या रसाने महादेवाचा अभिषेक केल्यास दरिद्रता दूर होते आणि धनाचे नवीन मार्ग मोकळे होतात.
advertisement
3/7
विशेषतः महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर जेव्हा चंद्र आणि सूर्याची स्थिती अनुकूल असते, तेव्हा हा उपाय केल्यास त्याचा परिणाम अत्यंत वेगाने होतो. 'ऋणमुक्तेश्वर महादेवाची' आराधना केल्याने कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होऊ लागतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
advertisement
4/7
उसाच्या रसाचा अभिषेक: महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर शुद्ध आणि ताज्या उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करावा. रस अर्पण करताना त्याची एक संथ धार असावी, हे लक्षात ठेवावे.
advertisement
5/7
'या' मंत्राचा जप करा: अभिषेक करताना "ॐ ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः" किंवा "ॐ नमः शिवाय" या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा मंत्र आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानला जातो.
advertisement
6/7
मानसिक तणावातून सुटका: कर्जाच्या ओझ्यामुळे येणारा मानसिक ताण या उपायामुळे कमी होतो. महादेवाची कृपा लाभल्याने तुम्हाला संकटाशी लढण्याचे बळ मिळते आणि बुद्धीला योग्य दिशा मिळते, ज्यामुळे तुम्ही कर्ज फेडण्याचे योग्य नियोजन करू शकता.
advertisement
7/7
साखरेचा किंवा मिठाचा वापर टाळा: अभिषेकासाठी वापरण्यात येणारा उसाचा रस हा नैसर्गिक असावा. त्यात बर्फ, लिंबू, मसाला किंवा साखर नसावी. नैसर्गिक आणि शुद्ध रसच महादेवाला प्रिय असतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
कर्जाच्या विळख्यातून झटपट होईल सुटका, आज शिवलिंगावर अर्पण करा 'ही' 1 वस्तू!