TRENDING:

ड्रीम होम तर बनवाल, पण 'या' चुका पडू शकतात महागात; घराचा नकाशा फायनल करण्यापूर्वी 'हे' वाचाच!

Last Updated:
स्वतःचे हक्काचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, घर बांधताना केवळ डिझाईन किंवा मजबूती पाहून चालत नाही, तर 'वास्तू शास्त्र' नियमांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
advertisement
1/7
ड्रीम होम तर बनवाल, पण 'या' चुका पडू शकतात महागात
स्वतःचे हक्काचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, घर बांधताना केवळ डिझाईन किंवा मजबूती पाहून चालत नाही, तर 'वास्तू शास्त्र' नियमांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वास्तूनुसार बांधलेले घर केवळ सुख-शांती देत नाही, तर त्यातील रहिवाशांची आर्थिक प्रगतीही घडवून आणते. याउलट, वास्तू दोष असल्यास विनाकारण आजारपण, कलह आणि पैशांची चणचण भासू शकते.
advertisement
2/7
मुख्य प्रवेशद्वाराची दिशा: घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. या दिशांना 'देवांच्या दिशा' मानले जाते. मुख्य दारासमोर कधीही कोणताही खांब, कचराकुंडी किंवा मोठी भिंत नसावी, कारण यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो.
advertisement
3/7
स्वयंपाकघराचे स्थान: स्वयंपाकघर नेहमी घराच्या आग्नेय कोपऱ्यात असावे. अग्नीचे स्थान योग्य असल्यास घरातील लोकांचे आरोग्य उत्तम राहते. स्वयंपाक करताना गृहिणीचे तोंड पूर्वेकडे असावे, हे विशेषतः शुभ मानले जाते.
advertisement
4/7
देवघर: घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे देवघर. ते नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. पूजा करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. देवघराच्या वर किंवा खाली शौचालय कधीही नसावे, हा मोठा वास्तू दोष मानला जातो.
advertisement
5/7
बेडरूम आणि तिजोरी: मुख्य बेडरूम घराच्या नैऋत्य कोपऱ्यात असावे. यामुळे कुटुंबातील प्रमुखाचे आरोग्य आणि अधिकार टिकून राहतात. तसेच, धनसंपत्तीची तिजोरी अशा प्रकारे ठेवा की तिचे तोंड उत्तरेकडे उघडेल, कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे.
advertisement
6/7
पाण्याचे स्त्रोत: पाण्याची टाकी किंवा विहीर नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावी. पाण्याची टाकी चुकूनही नैऋत्य कोपऱ्यात ठेवू नका, यामुळे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता असते.
advertisement
7/7
खिडक्या आणि मोकळी जागा: घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला जास्त खिडक्या आणि मोकळी जागा असावी. यामुळे घरामध्ये नैसर्गिक प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा खेळती राहते. दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या भिंती उत्तर-पूर्वेच्या तुलनेत थोड्या उंच आणि जाड असाव्यात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
ड्रीम होम तर बनवाल, पण 'या' चुका पडू शकतात महागात; घराचा नकाशा फायनल करण्यापूर्वी 'हे' वाचाच!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल