TRENDING:

दृष्ट लागते म्हणजे नेमकं काय होतं बरं? प्रेमानंद महाराजांनी दिलं अत्यंत सुंदर उत्तर

Last Updated:
Premanand Maharaj: लोकांना आपलं यश पचत नाही, लगेच दृष्ट लागते, अशी समजूत बऱ्यापैकी आपल्या मनात रुजलेली असते. मग ही दृष्ट सौंदर्यालाही लागू शकते. म्हणूनच आई लहान बाळाला काजळाची तीट लावते. परंतु दृष्ट लागते म्हणजे नेमकं होतं तरी काय? प्रेमानंद महाराज याबाबत काय सांगतात, जाणून घेऊया. 
advertisement
1/5
दृष्ट लागते म्हणजे नेमकं काय होतं? प्रेमानंद महाराजांनी दिलं अत्यंत सुंदर उत्तर
दृष्ट का लागते? या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांनी अत्यंत सहजपणे सुंदर असं उत्तर दिलं. प्रेमानंद महाराज हे वृंदावनातील प्रसिद्ध संत आहेत. त्यांचे विचार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत लाखो लोकांना त्यांचे विचार पटतात.
advertisement
2/5
महाराज म्हणाले, भगवान श्रीकृष्णालाही दृष्ट लागायची आणि आई यशोदा त्यांची प्रेमाने दृष्ट काढायची. दृष्ट कायम आपल्या प्रिय व्यक्तीलाच लागते, चिंताही आपल्याला त्याच व्यक्तीची वाटते जिच्यावर आपण प्रेम करतो. भगवान श्रीकृष्ण तर यशोदेसह संपूर्ण गोकुळाचे लाडके होते.
advertisement
3/5
प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की, खरंतर दृष्ट कधीच लागत नाही. परंतु हा एक प्रेमाचा भाग आहे. ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम असतं. तिच्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय असा आपल्याला संशय येतो किंवा भिती वाटते, चिंता वाटते. या काळजीपोटीच आपण आपल्या प्रिय व्यक्तीची दृष्ट काढतो.
advertisement
4/5
दृष्ट त्याच व्यक्तीची काढली जाते, जिच्यावर आपण प्रचंड प्रेम करतो. ज्या व्यक्तीचा आपल्याला प्रचंड लळा असतो, आपण काढली तर तिला लागलेली दृष्ट उतरेल, असं आपल्याला प्रेमापोटी वाटतं, असं प्रेमानंद महाराजांनी सांगितलं.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
दृष्ट लागते म्हणजे नेमकं काय होतं बरं? प्रेमानंद महाराजांनी दिलं अत्यंत सुंदर उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल