वायफळ खर्च करण्यात 'या' 3 राशींचा हात कोणीच धरू शकत नाही! मग कर्ज घ्यावं लागलं तरी बेहत्तर
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आजकाल सुखात जगण्यासाठी पैसे महत्त्वाचे असतात. कारण घराबाहेर पडल्यावर प्रत्येक गोष्टीसाठी पैसे खर्च करावे लागतात. काहीजणांना काही केल्या पैसे कमीच पडतात. उत्पन्न कमी असेल तर अशी परिस्थिती उद्भवणं साहजिक आहे, परंतु उत्पन्न जास्त असूनही असं घडत असेल, तर त्याचा संबंध आपल्या राशीशी असतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. (अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी / वाराणसी)
advertisement
1/5

ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 राशींपैकी काही राशी अशा असतात, ज्यांच्याकडून आपसूक भरपूर पैसे खर्च होतात. त्यातून त्यांच्या वाट्याला कर्जबाजारीपणाही येऊ शकतो. त्यामुळे या व्यक्तींनी आपल्या खर्चावर ताबा ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या राशी नेमक्या कोणत्या, जाणून घेऊया.
advertisement
2/5
मिथुन : या राशीच्या व्यक्ती आपल्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी भरपूर पैसे खर्च करतात. त्यांना महागडे कपडे, मोबाईल, घड्याळ आणि बूट वापरायला आवडतात. ज्योतिषशास्त्रानुसार, तरुण वयात ते प्रचंड शौकीन असतात. वयाची पस्तिशी आली की, त्यांच्या खर्चाला आळा बसतो.
advertisement
3/5
तूळ : या राशीच्या व्यक्तींचा स्वामी ग्रह आहे शुक्र. त्यामुळे त्या ज्या वेगाने पैसे कमवतात, त्याच वेगाने ते खर्च होतात. बहुतेकदा फिरण्याच्या छंदापायीच त्यांचा खर्च होतो. शिवाय समाजात त्या आपला स्टेटस राखून ठेवतात. त्यासाठीही बक्कळ पैसे खर्च करतात. मग अगदी कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल, पण आपल्या आवडीनिवडीचा ते त्याग करत नाहीत.
advertisement
4/5
कुंभ : या राशीच्या व्यक्तींचा <a href="https://news18marathi.com/photogallery/astrology/union-of-mars-and-rahu-will-put-these-5-signs-in-trouble-on-monday-test-of-patience-in-the-office-gh-mhrp-1184007.html">स्वभाव</a>च फार खर्चिक असतो. उत्त्पन्न कितीही असो त्यांचा खर्च अव्वाच्या सव्वा होतो. परंतु त्या स्वतःसाठी कमी आणि आपल्या प्रियजनांसाठीच जास्त <a href="https://news18marathi.com/photogallery/astrology/people-of-these-4-zodiac-signs-will-earn-money-june-1-commander-of-the-planets-will-do-the-maximum-mhrp-1184443.html">खर्च</a> करतात.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
वायफळ खर्च करण्यात 'या' 3 राशींचा हात कोणीच धरू शकत नाही! मग कर्ज घ्यावं लागलं तरी बेहत्तर