महाराष्ट्रातील या गावात गणेशोत्सव होत नाही साजरा, काय आहे कारण?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाराष्ट्रात एक गाव असं आहे जिथं गणेशोत्सव साजरा होत नाही. त्यामागं कारणंही अनोखं आहे.
advertisement
1/9

हिंदू धर्मात श्रावण महिन्यानंतर येणाऱ्या भाद्रपद अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात. प्रत्येक भागानुसार ही अमावस्या साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
advertisement
2/9
डोंबिवली नजीक वडवली गावात पिठोरी अमावस्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. येथील घराघरात पिठोरीची पूजा होते.
advertisement
3/9
यामध्ये तेरडा, लावा, दुर्वा, करडई, हळदीची फुले, कंट्रोलीचे तण, सरड्याची काशी, केळीची पाने अशी विविध पाने या पूजेसाठी जंगलातून शोधून आणली जातात.
advertisement
4/9
पुरुष नदीवर ही सर्व पाने धुतात आणि त्यानंतर त्याची आरती केली जाते. पूजा केलेली ही पाने टोपलीत ठेवून वाजत गाजत मिरवणूक काढली.
advertisement
5/9
ही मिरवणूक प्रत्येकाच्या घरापर्यंत येते. आपापल्या घरी जाऊन आई, पत्नी आणि मुलांसह पुन्हा यथासांग पूजा केली जाते.
advertisement
6/9
घरात पिठोरी पुजली जाते. या पूजेला पीठाने केलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो.
advertisement
7/9
विशेष म्हणजे या गावात पिठोरीकडे नवस करण्याची प्रथा आहे. आपली इच्छा पिठोरी अमावस्या पूर्ण करते अशी येथील लोकांची मान्यता आहे.
advertisement
8/9
वडवली गावचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिठोरी साजरी केली जात असल्याने गावात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही.
advertisement
9/9
ही अनोखी प्रथा अनेक वर्ष सुरू असून गावाची परंपरा जपत असल्याचे येथील गावकरी आणि सरपंच जितेंद्र पाटील सांगतात.