तब्बल 3 राजयोग 5 राशींचं नशीब चमकवणार! खूप ऊन सोसलं, मे अखेरीस गारवा मिळणार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 12 वर्षांनंतर वृषभ राशीत गुरू आणि शुक्र ग्रह एकत्र येणार आहेत. शिवाय बुधसुद्धा या राशीत येणार असल्यानं निर्माण होणारे योग अर्थातच दुर्मीळ असतील. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार, 19 मे रोजी शुक्र ग्रह मेष राशीतून बाहेर येईल आणि वृषभ राशीत प्रवेश करेल. तर 1 मे रोजी गुरू ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश झालाय. त्यामुळे आता जवळपास 12 वर्षांनी वृषभ राशीत अत्यंत शुभ असा 'गजलक्ष्मी योग' जुळून येणार आहे.
advertisement
2/7
31 मेच्या रात्री बुध ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश होईल. तिथं आधीपासून शुक्र आणि गुरू ग्रह विराजमान असल्यानं गजलक्ष्मी राजयोगामुळे बुधादित्य आणि मालव्य राजयोगही निर्माण होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार असून 5 राशींच्या व्यक्तींचं नशीब अक्षरशः उजळून निघेल.
advertisement
3/7
मेष : आपली आर्थिक स्थिती उत्तम होईल. घरात शुभ कार्य पार पडेल. करियरमध्ये मनासारखं यश मिळेल. व्यवसायातही चांगला नफा होईल.
advertisement
4/7
कर्क : आपल्याला आपले अडकलेले पैसे आता परत मिळतील. व्यापार विस्तारेल. दाम्पत्य जीवनात सुख येईल. अभ्यासात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांची साथ मिळेल.
advertisement
5/7
कन्या : आपल्यासाठी ही वेळ उत्तम आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. परदेशी प्रवासाचा योग आहे. आयुष्यात आनंदी आनंद येईल. समाजात आपला मान-सन्मान वाढेल.
advertisement
6/7
वृश्चिक : आपल्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम असेल. या दुर्मीळ योगामुळे आपली प्रचंड <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/3-big-planets-will-come-together-6-zodiac-signs-will-get-all-the-benefits-l18w-mhij-1183024.html">भरभराट</a> होईल. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबियांची पुरेपूर साथ मिळेल. करियरबाबतही हा काळ <a href="https://news18marathi.com/religion/1-rajyoga-can-make-a-person-a-millionaire-he-can-live-a-kings-life-mhij-1181909.html">सर्वोत्तम</a> आहे.
advertisement
7/7
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
तब्बल 3 राजयोग 5 राशींचं नशीब चमकवणार! खूप ऊन सोसलं, मे अखेरीस गारवा मिळणार