शनी साडेपाच महिने उलट चालेल! काळजी घ्या, 5 राशींसाठी हा काळ धोक्याचा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, 29 जूनला शनीदेव आपल्या मूळ त्रिकोणी राशीत म्हणजेच कुंभ राशीत वक्र होतील. त्यानंतर थेट 15 नोव्हेंबरला शनी सरळमार्गी चालायला लागेल, मात्र तोपर्यंत काही राशींच्या व्यक्तींनी काळजी घेणं आवश्यक आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/7

कुंडलीत शनीचं स्थान व्यवस्थित असेल तरच आयुष्य सुखात राहतं. परंतु जर शनी सुस्थितीत नसेल तर मात्र भयंकर अडचणींचा सामना करावा लागतो. आता 29 जून रोजी रात्री 12 वाजून 35 मिनिटांनी शनीची चाल उलट होणार असल्याने त्याचा काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल हे नक्की. या राशींच्या व्यक्तींनी घाबरून जाऊ नये, परंतु काळजी घ्यावी.
advertisement
2/7
मेष : शनीची वक्र चाल आपल्या अडचणी वाढवू शकते. आपल्या करियरमध्ये सर्वाधिक अडथळे येतील. खासगी जीवनही कोलमडेल. नात्यांमध्ये कडवटपणा येईल. परिणाम आपला ताण वाढेल.
advertisement
3/7
वृषभ : आपल्याला विविध अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरीत वरिष्ठांकडून ओरडा मिळेल, आर्थिक स्थिती बिघडेल, नुकसान होईल, आजारी पडाल.
advertisement
4/7
तूळ : शनीच्या वक्र चालीपासून आपण सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यात अनेक अडचणी येतील. नोकरीत खूप त्रास सहन करावा लागेल. समाजात मान-सन्मान कमी होईल.
advertisement
5/7
कर्क : आपल्याला खासगी जीवनात अडचणींचा सामना करावा लागेल, प्रचंड ताण येईल. करियर सांभाळा. जवळच्या व्यक्तींबाबत अशुभ संकेत मिळतील. घरात पैशांवरून वाद होतील.
advertisement
6/7
कुंभ : आपल्यासाठी हा काळ कठीण आहे. <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/rare-coincidence-between-jupiter-and-venus-after-years-will-be-beneficial-for-3-zodiac-signs-l18w-mhij-1169217.html">आरोग्य</a> बिघडू शकतं. मानसिक, शारीरिक अडचणींचा सामना करावा लागेल. <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/king-of-planets-will-transit-in-may-3-zodiac-signs-will-become-rich-l18w-mhij-1171810.html">करियर</a>बाबत विचारपूर्वक निर्णय घ्या.
advertisement
7/7
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शनी साडेपाच महिने उलट चालेल! काळजी घ्या, 5 राशींसाठी हा काळ धोक्याचा