शनीची मंगळावर तिसरी दृष्टी, 5 राशींसाठी अवघड काळ! 12 जुलैपर्यंत जरा जपून
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या मंगळ ग्रह आपल्या स्वराशीत म्हणजेच मेष राशीत विराजमान आहे. 12 जुलैपर्यंत या ग्रहाचा इथंच मुक्काम असेल. मेष राशीत असल्यानं मंगळ ग्रहावर शनीची तिसरी दृष्टी पडतेय. ही दृष्टी अत्यंत खतरनाक मानली जाते आणि ग्रह, ताऱ्यांच्या हालचालींचा परिणाम सर्व 12 राशींवर होत असतो. शनीच्या या खतरनाक दृष्टीचा 5 राशींवर अत्यंत नकारात्मक परिणाम होणार आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी याबाबत माहिती दिली आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/7

जोतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं की, मंगळावर शनीची दृष्टी पडणं ही धोक्याची घंटा मानली जाते. परंतु काही राशींना यामुळे फायदाही होतो, मात्र ज्या राशींच्या व्यक्तींना दुःख सहन करावं लागतं, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत दयनीय ठरतो. 12 जुलैपर्यंत मंगळ ग्रह मेष राशीत असल्यामुळे 5 राशीच्या व्यक्तींनी या काळात अत्यंत सतर्क राहणं आवश्यक आहे. या राशी कोणत्या, पाहूया.
advertisement
2/7
कर्क : आपल्यासाठी शनीची तिसरी दृष्टी नकारात्मक ठरेल. विशेषतः व्यवसायात तोटा होईल, मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. करियरमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील. त्यामुळे जरा संयम ठेवा, ही वेळही निघून जाईल.
advertisement
3/7
कन्या : शनीच्या तिसऱ्या दृष्टीमुळे आपलं काम वाढेल. आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागेल परंतु फळ मात्र त्या तुलनेनं कमी मिळेल. मात्र खचून जाऊ नका, हे दिवस सरायलाही वेळ लागणार नाही. पण या काळात अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी वाद होतील, त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.
advertisement
4/7
तूळ : आपल्याला या काळात प्रचंड संयमी राहावं लागेल. संपत्तीबाबत वादात तर अजिबात पडू नका. त्यावरून घरात प्रचंड तणाव निर्माण होईल. अविवाहितांना लग्न जुळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागेल.
advertisement
5/7
वृश्चिक : आपल्यासाठी हे दिवस फार अवघड आहेत. अडचणी येतील, परंतु त्यांचा सामना अत्यंत हिंमतीने करा. करियरमध्ये हाती अपयश येईल पण खचून जाऊ नका आणि या काळात कोणत्याही वादात पडू नका.
advertisement
6/7
मकर : आपल्यावर या दिवसांत कामाचं अतिरिक्त ओझं पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढं सहजतेनं काम करण्याचा <a href="https://news18marathi.com/religion/astrological-remedies-to-get-rid-of-debts-mhij-1202404.html">प्रयत्न करा</a>. खर्च वाढतील, नातेसंबंध बिघडतील. जोडीदारासोबत चांगली वागणूक ठेवा. लहान लहान गोष्टींवरून वाद उकरून काढू नका.
advertisement
7/7
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/people-of-these-three-zodiac-signs-are-very-lucky-from-their-birth-l18w-mhij-1200992.html">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शनीची मंगळावर तिसरी दृष्टी, 5 राशींसाठी अवघड काळ! 12 जुलैपर्यंत जरा जपून