Exclusive : राम मंदिराचे आजपर्यंत कधी न पाहिलेले फोटो, बांधकाम कुठपर्यंत आलं लगेच समजेल, PHOTOS
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आला आहे. रामललाच्या आगमनाची सर्वांना प्रतिक्षा लागली आहे. फक्त भारतच नव्हे तर जगभरातील रामभक्तांना या सोहळ्याची आतुरता लागली आहे. राम मंदिराची लेटेस्ट फोटो समोर आली आहे. या माध्यमातून राम मंदिराचे बांधकाम कुठपर्यंत आले आहे, हे तुम्हाला समजण्यास मदत होईल. पाहूया, राम मंदिराचे लेटेस्ट फोटो.
advertisement
1/11

रामलल्लांच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी संपूर्ण रामभक्त उत्साहात आहेत. सर्वांना या सोहळ्याची उत्सुकता आहे. देश-विदेशातील भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे
advertisement
2/11
मंदिराच्या तळमजल्याचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं असून यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ते पूर्ण होऊ शकतं, असा अंदाज आहे. या तळमजल्यात सागवानाचे 40 दरवाजे, खिडक्या असणार आहेत.
advertisement
3/11
राम मंदिर बांधकामात वापरलं जाणारं हे सागवानाचं लाकूड महाराष्ट्रातून आणण्यात आलं आहे. 1000 वर्ष टिकणाऱ्या या लाकडामुळे राम मंदिरही वर्षानुवर्षे भक्कम स्थितीत राहील.
advertisement
4/11
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे करोडो रामभक्तांचे स्वप्न साकार झाले. अनेक दिवसांपासून सुरू असलेला मंदिर-मशीद वाद त्यानंतर संपुष्टात आला, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला. आज अयोध्येत भव्य मंदिर तयार होत आहे.
advertisement
5/11
<a href="https://news18marathi.com/religion/who-is-the-sculptor-who-made-the-idol-of-sri-rama-in-ayodhya-his-kedarnath-connection-gh-mhrp-1100023.html">आपल्या दैवतासाठी</a> उभारले जाणारे भव्य मंदिर पाहून राम भक्त भारावून गेले आहेत. संपूर्ण मंदिराचे बांधकाम 2025 मध्ये पूर्ण होईल. परंतु मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे.
advertisement
6/11
<a href="https://news18marathi.com/religion/in-ayodhya-sri-rama-will-be-consecrated-on-a-special-occasion-duration-of-84-seconds-is-auspicious-gh-mhss-1100687.html">प्रभू राम 22 जानेवारी 2024</a> रोजी आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. त्यासाठी तीर्थक्षेत्र ट्रस्टने तयारी सुरू केली आहे. तीर्थ क्षेत्र ट्रस्टनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पत्र पाठवले आहे.
advertisement
7/11
प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होतील, त्यादरम्यान भव्य कार्यक्रम होणार आहेत. देशभरात सात दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट 10 सदस्यांची समितीही स्थापन करत आहे. देशातील प्रत्येक मठ मंदिरात या दिवशी धार्मिक विधी आयोजित केले जातील.
advertisement
8/11
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
advertisement
9/11
राम मंदिरात राजस्थानच्या बंसी पहाडपूर येथील व्हाईट मार्बलचा उपयोग करण्यात आला आहे.
advertisement
10/11
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य मंदिराचे गर्भगृह पांढऱ्या संगमरवरी दगडाने (मार्बल) बनवले जात आहे. एवढेच नाही तर मंदिरातील गर्भगृहाच्या दरवाजाची चौकट, फरशी, दार सुद्धा मकराणाच्या पांढऱ्या संगमरवराने बनवले जात आहे. या दगडावर सुरेख कोरीव कामही केले जात आहे.जे पाहणे अद्भूत आणि अलौकिक आहे.
advertisement
11/11
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या मते, मकरानाचे पांढरे संगमरवर 100 वर्षांपासून त्यांचा रंग बदलत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, भगवान रामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीत ताजमहालपेक्षा चांगल्या दर्जाचा संगमरवरी दगड वापरण्यात येत आहे, जो 100 वर्षेही खराब होणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Exclusive : राम मंदिराचे आजपर्यंत कधी न पाहिलेले फोटो, बांधकाम कुठपर्यंत आलं लगेच समजेल, PHOTOS