Drink And Drive : जेवण, वेलची, माउथवॉश वापरला की दारुचा वास येत नाही? कसं काम करतं पोलिसांच्या हातातील ब्रीथलायझर मशीन?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पोलिसांना चकमा देण्यासाठी कांदा खातात, वेलची चघळतात किंवा माउथवॉश वापरतात. पण खरंच या गोष्टींमुळे पोलिसांच्या मशीनला फसवता येतं का? ब्रीथलायझर मशीन नक्की कसं काम करतं? चला जाणून घेऊया.
advertisement
1/8

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन असो किंवा शनिवार-रविवारची नाकाबंदी, रस्त्यावर पोलीस ब्रीथलायझर मशीन घेऊन उभे दिसतात की मद्यपींची धाकधूक वाढते. अनेकजण पोलिसांना चकमा देण्यासाठी कांदा खातात, वेलची चघळतात किंवा माउथवॉश वापरतात. पण खरंच या गोष्टींमुळे पोलिसांच्या मशीनला फसवता येतं का? ब्रीथलायझर मशीन नक्की कसं काम करतं? चला जाणून घेऊया.
advertisement
2/8
वेलची किंवा माउथवॉशने वास जातो का?मद्यपान केल्यानंतर तोंडाचा जो वास येतो, तो घालवण्यासाठी लोक वेलची, लवंग, पान किंवा माउथवॉशचा वापर करतात. यामुळे तोंडाचा वरवरचा वास नक्कीच बदलतो, पण पोलिसांच्या मशीनला तुम्ही फसवू शकत नाही. कारण, ब्रीथलायझर मशीन तुमच्या तोंडाचा वास मोजत नाही, तर तुमच्या फुफ्फुसातील हवा तपासते.
advertisement
3/8
ब्रीथलायझर मशीन कसं काम करतं?जेव्हा तुम्ही दारू पिता, तेव्हा ती पचनसंस्थेतून रक्तात मिसळते. रक्त जेव्हा फुफ्फुसांमधून जातं, तेव्हा रक्तातील अल्कोहोलचे काही अंश बाष्प स्वरूपात हवेत मिसळतात. जेव्हा पोलीस तुम्हाला मशीनमध्ये फुंकर मारायला सांगतात, तेव्हा तुमच्या फुफ्फुसांतील ती 'अल्कोहोलयुक्त हवा' मशीनमध्ये जाते.
advertisement
4/8
मशीनमध्ये एक खास 'फ्यूल सेल' किंवा 'केमिकल सेन्सर' असतो. तुम्ही मारलेल्या फुंकरीतील अल्कोहोलचा जेव्हा या सेन्सरशी संपर्क येतो, तेव्हा तिथे एक रासायनिक प्रक्रिया होऊन विद्युत लहरी तयार होतात.तुमच्या श्वासात जेवढी जास्त दारू, तेवढा जास्त विद्युत प्रवाह तयार होतो आणि मशीनच्या स्क्रीनवर BAC (Blood Alcohol Content) आकडा दिसतो.
advertisement
5/8
जेवण केल्यावर मशीनमध्ये काय येतं?अनेकांना वाटतं की भरपूर जेवण केलं की अल्कोहोल पचतं आणि मशीनमध्ये येणार नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जेवणामुळे अल्कोहोल रक्तात मिसळण्याचा वेग थोडा कमी होऊ शकतो, पण ते पूर्णपणे गायब होत नाही. जोपर्यंत तुमच्या रक्तात अल्कोहोल आहे, तोपर्यंत तुमच्या फुफ्फुसातील हवेद्वारे ते ब्रीथलायझरमध्ये पकडलं जाणारच.
advertisement
6/8
माउथवॉश वापरणं ठरू शकतं उलटंकाही माउथवॉशमध्ये स्वतःच अल्कोहोलचे प्रमाण असते. जर तुम्ही नुकताच माउथवॉश वापरला असेल आणि त्यानंतर लगेच फुंकर मारली, तर ब्रीथलायझर मशीनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त दिसू शकते, ज्यामुळे तुम्ही प्यायले नसलात तरी गोत्यात येऊ शकता.
advertisement
7/8
पोलिसांची नाकाबंदी आणि कायदामोटार वाहन कायद्यानुसार, जर तुमच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण 30 मिलीग्राम प्रति 100 मिली रक्त (30mg/100ml) पेक्षा जास्त आढळले, तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई किंवा कारावासाची शिक्षा होऊ शकते. वेलची, पेपरमिंट किंवा कांदा तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला फसवू शकतात, पण विज्ञानावर आधारित ब्रीथलायझर मशीनला नाही. त्यामुळे 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' टाळणे हाच सुरक्षित राहण्याचा एकमेव मार्ग आहे.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी मद्यपानासाठी प्रोत्साहन देत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Drink And Drive : जेवण, वेलची, माउथवॉश वापरला की दारुचा वास येत नाही? कसं काम करतं पोलिसांच्या हातातील ब्रीथलायझर मशीन?