बीडमध्ये सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला भयंकर आग, फोटो समोर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत.
advertisement
1/7

बीड जिल्ह्यापासून जवळच असलेल्या पालवन शिवारात सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि वनविभागाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पाला भीषण आग लागली आहे.
advertisement
2/7
या आगीत शेकडो झाडे व रोपे जळून खाक झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत.
advertisement
3/7
समोर आलेल्या माहितीनुसार पालवन शिवारातील देवराई परिसरात धुराचे लोट दिसू लागले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले.
advertisement
4/7
सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळलेले गवत असल्याने आगीचा भडका अधिकच वाढत आहे. आगीत झाडाझुडपांसह जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
5/7
सह्याद्री देवराई प्रकल्प हा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या प्रकल्पांतर्गत स्थानिक वृक्षलागवड, देवराई संवर्धन व जैवविविधतेचे संरक्षण करण्यात येत होते.
advertisement
6/7
या आगीमुळे अनेक वर्षांच्या मेहनतीला फटका बसल्याचे चित्र आहे. आगीत लहान-मोठी झाडे, रोपे तसेच वन्यजीवांचे अधिवास बाधित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
advertisement
7/7
आगीची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले असून त्यांची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.